शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

ले-आउटमधील तारेचे कुंपण हटविण्याचे आदेश

By admin | Updated: July 26, 2015 02:24 IST

शहरालगतच्या गणेशपूर गावाजवळ नव्याने निर्माण झालेल्या ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता

शेतकऱ्याच्या उपोषणाची सांगता : रस्ता मोकळा करून देण्याची होती मागणी, गणेशपूर येथील प्रकारवणी : शहरालगतच्या गणेशपूर गावाजवळ नव्याने निर्माण झालेल्या ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता ले-आऊटधारकाने काटेरी कुंपण करून अडविला होता. त्यामुळे आनंद बोढाले यांना शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला. तसेच एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसद्वारे शाळेत जाता येत नव्हते. हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी बोढाले तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. अखेर चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे प्रशासनाने दखल घेतली व ले-आऊटमधील रस्त्यावर केलेले कुंपन २४ तासांच्या आत हटवावे, असा आदेश ले-आऊटधारकाला बजावला. त्यानंतर बोढाले यांनी उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याहस्ते शरबत घेऊन उपोषण सोडले.गणेशपूर येथील शेत गट क्रमांक ३/१-ब मध्ये महावीर डेव्हलपर्सने ले-आऊट टाकले. या शेताच्या पलीकडे आनंद बोढाले यांचे शेत गट क्र. २/१, २/२ आहे. या शेतात जाण्यासाठी सदर ले-आऊटमधील १२ मीटर रूंदीचा रस्ता टाकण्यात आला. मात्र तो रस्ता महावीर डेव्हलपर्सच्या भागीदारांनी काटेरी तारेचे कुंपण करून बंद केला. तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी आनंद बोढाले यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आनंद बोढाले यांनी तहसील कार्यालयासमोर २० जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतला व रस्त्यावर केलेले कुंपन बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सदर कुंपम २४ तासांच्या आत काढून टाकावे, असा आदेश पारित केला. यावरून तहसीलदारांनी महावीर डेव्हलपर्सच्या भागीदारांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत कुंपन काढून टाकण्याची नोटीस दिली. कुंपण न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला. तसेच आनंद बोढाले यांनी केलेल्या इतर मागण्यांवरसुद्धा यथोचित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)