शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

 जिल्हाधिकारी  म्हणाले की, यापूर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे  लसीकरणासाठी केंद्रावर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग आणि  आजारी लोकांचे लसीकरण  करण्यासाठी नियोजन करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  येत्या दोन ते तीन महिन्यांत जिल्ह्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेली गावे केंद्रित करून तेथे  लसीकरण करावे.  ग्रामीण भागात दर दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रामार्फत किमान एक हजार लसीकरण करावे, तसेच नगरपालिका क्षेत्रात पुढील महिनाभरात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी नियोजनपूर्वक कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका टास्क फोर्स यंत्रणेला दिल्या. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या नियामक मंडळाची सभा बुधवारी नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी  म्हणाले की, यापूर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे  लसीकरणासाठी केंद्रावर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग आणि  आजारी लोकांचे लसीकरण  करण्यासाठी नियोजन करावे.  जिल्हास्तरावर लसीकरणाचा आढावा घेऊन मागे असलेल्या तीन तालुक्यांच्या टास्क फोर्सला यावेळी समज देण्यात येईल. ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांना प्रसूतीकरिता खाजगी दवाखान्यात खर्च पडू नये यासाठी प्रसूतीची सर्व कामे शासकीय दवाखान्यामध्येच करण्यात यावी, याकरिता आवश्यक सोयी- सुविधांची पूर्तता प्रशासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ असलेल्या केंद्रात व रुग्णालयात संबंधित रुग्णांची तपासणी त्यांनीच केली पाहिजे, या बाबीवर बाबीवर बारकाईने लक्ष देण्यात यावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात आजपासून स्वच्छता मोहीम- जिल्ह्यात डेंग्यू आजार पसरू नये यासाठी नगरपालिका व ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू करावी, यात नागरिकांनादेखील सहभागी करून घ्यावे. या मोहिमेत डासाची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालाय टाकीच्या पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरी वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे आदी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. ही स्वच्छता मोहीम उद्यापासूनच २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभर राबवली गेली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस