शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आम आदमी’ला भरपाईचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अपघाती मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करूनही ‘आम आदमी’ चा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ...

ठळक मुद्देरिपोर्टवर अडले : खडकीतील महिलेला मंचचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपघाती मृत्यू झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट दाखल करूनही ‘आम आदमी’ चा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. राळेगाव तालुक्याच्या खडकी येथील शारदाबाई नामदेवराव आत्राम या शेतकरी महिलेला नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे.राळेगाव तहसील कार्यालयामार्फत भारतीय आयुर्विमा महामंडळ अमरावतीकडे शेतकºयांचा ‘आम आदमी’ योजने अंतर्गत विमा काढण्यात आला आहे. शारदाबाई आत्राम यांचे पती नामदेवराव आत्राम यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. त्यांनी ‘आम आदमी’ विमा योजनेच्या लाभासाठी विमा कंपनीच्या अमरावती विभागीय कार्यालयाकडे अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी लाभ नाकारला.अपघाती मृत्यू झाल्यास सदर योजने अंतर्गत ७५ हजार रुपये भरपाई मिळायला पाहिजे होती. विमा कंपनीने मात्र केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्ट सादर केला नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारली. याविरोधात शारदाबाई आत्राम यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारीवर युक्तीवादा दरम्यान शारदाबाई आत्राम यांनी केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्ट सादर केला नसल्याचे कंपनीने सांगितले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नामदेवराव आत्राम यांचा मृत्यू अपघाती झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा वेळी केमिकल अ‍ॅनॉलिसीस रिपोर्टची आवश्यकता नाही. या निर्णयावर मंच पोहोचले. विमा कंपनीने जाणिवपूर्र्वक भरपाई नाकारली हे स्पष्ट होत असल्याचे निकालात म्हटले आहे. विमा कंपनीने शारदाबाई आत्राम यांना विमा दाव्याची रक्कम रुपये ७५ हजार, शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार आणि तक्रार खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावा, असा आदेश दिला आहे.