शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन सभेला विरोध कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 05:00 IST

सर्वसाधारण सभेत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मालमत्ता करावर कोविड काळात आकारलेला दंड माफ केला जावा, त्याला सभेची मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. नगरसेवकांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा विषय नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी ठेवला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : आज सर्वसाधारण सभा, ऑनलाईन सभेत प्रश्न मांडता येत नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन आयोजित केली आहे. सकाळी ११ वाजता ही सभा आहे. मात्र मागच्या ऑनलाईन सभेचा अनुभव बघता नगरसेवकांनी या ऑनलाईन सभेला विरोध दर्शविला आहे. ऑनलाईन सभेत कोणत्याच विषयावर चर्चा होत असून पालिका सभागृहात फिजिकल अंतर राखून सभा घेणे शक्य असल्याची भूमिका नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्यापुढे मांडली.सर्वसाधारण सभेत शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय ठेवण्यात आला आहे. मालमत्ता करावर कोविड काळात आकारलेला दंड माफ केला जावा, त्याला सभेची मान्यता घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव आहे. नगरसेवकांच्या मेडिक्लेम पॉलिसीचा विषय नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी ठेवला आहे. अमृत योजनेतील सांडपाण्यावर प्रक्रिया प्लांटला वन हद्दीत ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव, कोविडच्या उपाययोजनांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता, शिवाजीनगर येथील उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नाव देण्याचा विषय सभेत आहे.याशिवाय विविध चौक, रस्त्यांचे नामकरण, खुल्या भूखंडातील १० टक्के जागा विविध संस्था, मंदिरे यांना देण्याचा प्रस्ताव सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. एकूण १७ विषयांवर ही ऑनलाईन सभा होणार आहे. मात्र ऑनलाईन सभेत नगरसेवकांना आपली बाजू मांडता येत नाही. लिंकची अडचण येते. त्यामुळे ही सभा नेहमीप्रमाणे सभागृहातच घेतली जावी, अशी आग्रही भूमिका भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.पालिकेत पुरेशी जागा उपलब्ध असल्याचा दावानगरपरिषदेतील सदस्य संख्या पाहता पुरेसी जागा पालिकेत उपलब्ध आहे. फिजिकल डिस्टसिंग राखून सभेचे कामकाज करणे शक्य आहे. त्यामुळे ऑनलाईन सभा रद्द करून नियमित सभा घेण्यात यावी, अशी मागणी भाजप गटनेते विजय खडसे, बांधकाम सभापती मनीष दुबे, आरोग्य सभापती मनोज मुधोळकर, प्रा.डॉ. अमोल देशमुख, शुभांगी हातगावकर, पुष्पा ब्राम्हणकर, रिता धावतोडे, लता ठोंबरे, साधना काळे आदींनी केली आहे.