शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

मारेगाव येथे विकास कामात विरोधकांचा अडथळा

By admin | Updated: October 1, 2015 02:26 IST

तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामात विरोधक अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच किरण गेडाम..

वणी : तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामात विरोधक अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच किरण गेडाम यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.मारेगाव (कोरंबी) येथील गटग्रामपंचायतीला तेराव्या वित्त आयोगातून एक लाख ४५ हजारांचा निधी प्राप्त झाला. ग्रामपंचायतीने २२ जून रोजी मासिक सभा घेतली. त्यात सतीश काळे ते डोंगरकर यांचे घरापर्यंत ३५ मीटर व जगदीश घोसले ते मारोती घोसले यांचे घरापर्यंत ३५ मीटर, असा एकूण ७० मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र अंदाजपत्रकामध्ये निधीनुसार ४७ मीटर कामाला मंजुरात मिळाली. त्यामुळे ७० मीटर घेतलेले काम पूर्ण झाले नाही. परिणामी २३ सप्टेंबरच्या मासिक सभेमध्ये ठरावात बदल करून त्याच प्रभागात ३५ मीटर काम व उर्वरित १३ मीटर काम अपूर्ण असलेला रस्ता भाऊराव ठाकरे ते साबरे यांच्या घरापर्यंत घेण्यासाठी चर्चा केली. तथापि या कामाला विरोधी सदस्य विकास भोंगळे यांनी विरोध दर्शविल्याचे निवेदनात म्हटले आहे.आता गावातील सोसायटीची निवडणूक होणार असून ही निवडणूक डोळ्या समोर ठेवून भोंगळे सरपंचाविरूद्ध खोटे आरोप करीत असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. प्रथम घेतलेले काम करा, अन्यथा निधी परत गेला तरी चालेल, परंतु दुसरे काम करायचे नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. ही दोन्ही कामे नियमाला धरून रद्द करून घेतलेल्या २२ जूनच्या ठरवात बदल केला व प्रभाग क्रमांक तीमधील देवराव काळे ते बाळू वैद्य यांच्या घरापर्यंत काम करण्याचा ठराव बहुमताने पारीत करण्यात आला. त्याला गटविकास अधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली. त्यामुळे निधी परत जाणार नाही, निधी खर्च करण्याची मुदत ३१ डिसेंबर असल्याने तीन महिने बाकी आाहे. विरोधक विकास कामात अडथळा निर्माण करून महिला सरपंचावर विविध आरोप करून बदनामी करीत असल्याचाही आरोप सरपंच गेडाम यांनी निवेदनातून केला आहे. अडथळा करणाऱ्यांना अंकुश लावावा, अशी मागणी सरपंच गेडाम यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)