शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचितांना पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीत संधी

By admin | Updated: July 4, 2015 02:43 IST

पहिल्या फेरीत कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा हव्या असलेल्या आणि विद्या शाखेत प्रवेशापासून

यवतमाळ : पहिल्या फेरीत कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा हव्या असलेल्या आणि विद्या शाखेत प्रवेशापासून वंचित राहिलेल्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीत संधी उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५१ टक्के जागा समाविष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी शैक्षणिक सत्र २०१५-१६ प्रवेश प्रक्रियेतील प्रथम फेरीचे जागा वाटप १ जुलै रोजी झाले. तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत अल्पसंख्यक कोट्याच्या जागा समाविष्ट केल्या नव्हत्या. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ६९ अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. या सर्व ६९ महाविद्यालयातील एकूण नऊ हजार ५०० जागा या सर्व विद्यार्थ्यांकरिता पुढील फेरीमध्ये उपलब्ध होवू शकतात.अल्पसंख्यक दर्जा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २० टक्के जागा मॅनेजमेंटसाठी तर २९ टक्के जागा या कॅप प्रक्रियेसाठी असतात. तसेच अल्पसंख्यकांसाठी असलेल्या ५१ टक्के गाजा प्रवेश प्रक्रियेसाठी कॅपमध्ये समाविष्ट केल्या जातात. या ५१ टक्के जागा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रथम फेरीत समाविष्ट करण्यात आल्या नाही. पुढील फेरीत अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सर्व जागा समाविष्ट झाल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. (वार्ताहर)