शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:10 IST

राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ठळक मुद्देनितीन गडकरी । पांढरकवडा येथे ‘कृष्णामाई’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते येथील सुराणा भवनमध्ये पांढरकवडाच्या पहिल्या माजी नगराध्यक्ष स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेल्या ‘कृष्णामाई’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पारवेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कांचन गडकरी, नगराध्यक्ष वैशाली नहाते, अ‍ॅड. भैय्यासाहेब उपलेंचवार, डॉ. अरूण कुळकर्णी, दीपक पतकी, रंजना लाभे, माधव लाभे उपस्थित होते. ना. गडकरी पुढे म्हणाले की, स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. जात, पात, पंथ, भाषा न पाहता त्यांनी गरिबातल्या गरीब माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच पांढरकवडा शहरवासीयांनी त्यांच्यावर प्रेम केले, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद आज आहे, उद्या नाही. आपले पद गेल्यावरही आपल्याला कोणीही विचारत नाही, असे म्हटले जाते. परंतु पद गेल्यावरही आपले सहकारी, आपले मित्र एवढेच नाही तर विरोधकांनी आपल्याला तोच सन्मान दिला पाहिजे आणि तो सन्मान आपल्याला मिळतो. याचा अनुभव आपल्याला आहे आणि म्हणूनच विरोधकांशीही सन्मानाने वागावे, विरोधक जरी असला तरी त्याचे काम आपण करतो, असेही ते म्हणाले. यावेळी पारवेकर, उपलेंचवार यांनीही आपले विचार मांडले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी