शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात निष्ठावान मतदारांचा दलबदलूंना विरोध

By admin | Updated: February 6, 2017 00:23 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या

जिल्हा परिषद निवडणूक : मतदार विचारत आहेत नेत्यांना जाब उमरखेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या या काळात सामान्य मतदार गोंधळात दिसत असून निष्ठावान मतदार मात्र अशा दलबलूंना विरोध करताना उमरखेड तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात भाजपाकडे वाढलेली गर्दी त्या पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल हे नजीकच्या काळात दिसेलच. काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात काही प्रमाणात भाजपाला यश आले आता आमचा विजयी रथ कुणी रोखू शकत नाही, असा त्या पक्षाचा गैरसमज झालेला दिसतो. जिल्ह्यात जे चित्र या पक्षाने निर्माण केले आहे. त्यात उमरखेड तालुकाही सुटला नाही. कोण कोणत्या पक्षातून त्याग करून दुसऱ्या पक्षात गेले त्यावर कार्यकर्ते नाराज दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता भोगून तृप्त झालेले आता दुसऱ्या पक्षाकडे जाताना दिसत आहे. अशा सत्तालोलूपांची भाजपाकडे गर्दी वाढलेली दिसत आहे. दोन वर्षापूर्वीच काँग्रेसची सत्ता चाखून अनेक जण भाजपाच्या वाटेवर आले होते. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून अनेक जण भाजपात येऊन तिकीटाचे दावे झाले आहे. अनेकांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादीत संघटनात्मक पदे उपभोगली आहे. ही मंडळी आता सत्तेच्या मागे धावताना दिसत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दलबदलू नेते गावात आल्यानंतर सामान्य मतदार त्यांना जाब विचारताना दिसत आहे. निष्ठावान मतदार आपल्या नेत्याने पक्ष बदलल्याने प्रचंड नाराज झाल्याचे दिसतात. या मंडळींना जाब विचारल्यावर राजकारणात सर्वकाही चालते असेच म्हणतात. परंतु आगामी काळात निष्ठावान मतदार या दलबलूंना कसा धडा शिकवितात हे पाहणे महत्वाचे आहे. सध्या सर्वत्र पक्षांतराची लाट आली असून उमरखेड तालुकाही त्याला अपवाद नाही. परंतु आपली प्रतिमा जोपासण्यास नेते कमी पडल्याने त्यांंना दुसऱ्या पक्षाची कास धरावी लागत असल्याचे मतदारात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)