शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पोस्टल ग्राऊंडवर केवळ ‘फूड पार्क’

By admin | Updated: September 6, 2015 02:24 IST

पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या २६ दुकानांमध्ये केवळ ‘फूड पार्क’ राहणार आहे. त्यामुळे कार्यालये थाटू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

जागेचाही लावला भाव : बाजारापेक्षा १० टक्के जादा दरयवतमाळ : पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या २६ दुकानांमध्ये केवळ ‘फूड पार्क’ राहणार आहे. त्यामुळे कार्यालये थाटू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पोस्टल ग्राऊंडवर बांधण्यात आलेल्या दुकानांचे भाडे व डिपॉझिटची रक्कम बरीच मोठी असली तरी ही दुकाने नेमकी कुणाला देणार याची चर्चा गेली दोन दिवस सुरू होती. अखेर तेथे केवळ ‘फूड पार्क’ राहणार असल्याचे सांगण्यात आले. लीजवर दिल्या जाणाऱ्या या दुकानांना बाजार भावानुसार डिपॉझिटची रक्कम आकारण्यात आली आहे. शिवाय बाजारभावापेक्षा दहा टक्के जादा भाडे आकारले गेले आहे. दुकानाचा आकार व त्या तुलनेत डिपॉझिट व भाड्याची वाढलेली रक्कम पाहूनच नगररचना विभागाने अप्रत्यक्ष विरोध दर्शवित या दुकानांची फाईल थंड बस्त्यात ठेवली होती. मात्र प्रशासनाकडून दणका आल्यानंतर ही फाईल मुंबईला पाठविण्यात आली. त्यानंतर त्याला मंजूरी मिळाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात या दुकानांचा आराखडा तयार झाला. पोलीस अधीक्षक कार्यालयाला लागून असलेली दुकाने कार्यालयीन कामासाठी, तर त्याच्या बाजूची दुकाने महिला बचत गटांना, शेतकरी बचत गटांना वाजवी किमतीत देण्याचे तत्वत: ठरविण्यात आले होते. परंतु त्यांची बदली झाली आणि हे उद्दिष्ट मागे पडले. आता तेथे ‘फूड पार्क’ आणि तेही बाजार भावाने थाटले जाणार आहे. (प्रतिनिधी)