शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अवघे शेतकरी झाले चिंतातूर

By admin | Updated: June 6, 2014 00:14 IST

कृषी केंद्र संचालकांनी शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले असले, तरी शेतकर्‍यांकडे बियाणे खरेदीसाठी पैसा नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.

लक्ष्मीचे सोने गहाण  : बियाणे, खतासाठी धावपळ झाली सुरूपाटणबोरी : कृषी केंद्र संचालकांनी शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले असले, तरी शेतकर्‍यांकडे बियाणे खरेदीसाठी पैसा नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. गतवर्षी कमी झालेले कापसाचे उत्पादन, त्याला मिळालेला कमी दर, बियाणे व महागडी औषधी, रासायनिक खतावरील खर्च, या सर्वांंंच्या वजा-बाकीत शेतकर्‍यांना हाती काहीच उरले नाही. गेल्यावर्षी ‘मक्त्या’ने शेती कसणार्‍यांना तर आपल्या मेहनतीचा मोबदलासुध्दा मिळाला नाही. या परिस्थितीत येत्या पावसाळ्यात पेरणी कशी करायची, पैसे कुठून आणायचे, या प्रश्नाने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांना घरातील लक्ष्मीचे सोने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. काही शेतकरी सावकारांकडे शेती ‘रजिस्ट्री’ करून व्याजाने पैसे उचलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गतवर्षी उधार देणार्‍या कृषी केंद्र संचालक व दलालांनी यावर्षी आपले हात आवरलेले आहेत. परिणामी शेतकर्‍यांना आता उधारीत बियाणे, खत मिळणे कठीण झाले आहे. यावर्षी अनेक नवीन बियाणे कंपन्या व वाणांचा अक्षरश: पूर आल्याने कोणते बियाणे पेरावे, याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी मक्त्याने शेती कसणार्‍या शेतकर्‍यांची संख्या यावर्षी कमी झाल्याने शेतीचा मक्ताही घटला आहे. तीन-चार वर्षांंंच्या नापिकीने त्रस्त अनेक शेतकर्‍यांनी शेती विकायलाही काढली आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने अनेक शेतकर्‍यांना नाईलाजाने शेती कसावी लागत आहे. बियाणे, औषधी, रासायनिक खते यांच्या गगनाला भिडणार्‍या किमती, सालदारांचे वाढणारे साल (पगार), बैलांच्या वाढलेल्या किंमती, तसेच नापिकीमुळे शेतकरी दृष्टचक्रात सापडले आहे. त्यांना पेरणीसाठी आर्थिक तजवीज करताना प्रचंड त्रास होत आहे. घरातील लक्ष्मीचे सोने गहाण ठेवून काही शेतकरी बियाणे, खते खरेदी करीत आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांकडे गहाण ठेवण्यासाठीही घरात काहीच नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे.  (वार्ताहर)