शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

३८ लाखांच्या वनघोटाळ्यात केवळ आरोपपत्र

By admin | Updated: August 5, 2016 02:28 IST

वन योजनांमध्ये ३८ लाख रुपयांचा घोटाळा निष्पन्न होऊनही दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना केवळ आरोपपत्र देऊन यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने

दोन आरएफओंचे निलंबन-फौजदारी दूरच : सीसीएफ कार्यालय मेहेरबान, ‘एलएक्यु’नंतरही कारवाई थंडबस्त्यात यवतमाळ : वन योजनांमध्ये ३८ लाख रुपयांचा घोटाळा निष्पन्न होऊनही दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना केवळ आरोपपत्र देऊन यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने कारवाईचा फार्स निर्माण केला आहे. वास्तविक या अधिकाऱ्यांवर निलंबन, फौजदारी या सारखी कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. बी.के. चव्हाण आणि पठाण हे अनुक्रमे वाशिम आणि कारंजा वन परिक्षेत्राचे आरएफओ आहेत. त्यांना यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे अभय असल्याचे वन वर्तुळात बोलले जाते. निकृष्ट वनांचे पुनर्ररोपण, वनसंवर्धन, जलसंधारण या कामांमध्ये सन २०१२-१३ ते २०१४-१५ या काळात कारंजा व वाशिम वन परिक्षेत्रात घोटाळा झाला. मूल्यांकन विभाग, दक्षता विभाग आणि वन अभियंत्यांच्या चौकशीत घोटाळा निष्पन्न झाला. कारंजामध्ये १७ लाख ९९ हजार तर वाशिममध्ये १९ लाख ६० हजार ६४४ रुपयांचा घोटाळा सिद्ध झाला. त्यामुळे कारंजा व वाशिमच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबन, फौजदारी कारवाई बंधनकारक होती. परंतु यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने या कठोर कारवाईला बगल देऊन दोनही आरएफओंना केवळ कलम ८ अन्वये १९ एप्रिल २०१६ रोजी आरोपपत्र देऊन त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. या माध्यमातून या घोटाळेबाज आरएफओंना सीसीएफ कार्यालयाने जणू सुरक्षा प्रदान केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान कारंजा व वाशिम वन परिक्षेत्रातील सुमारे ३८ लाखांच्या घोटाळ्याच्या निमित्ताने मूर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न (क्र.६२२८१) उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना या प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले. घोटाळा सिद्ध होऊनही सीसीएफ कार्यालय या दोनही आरएफओंविरोधात निलंबन, फौजदारी कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याने त्यांना सीसीएफचे तर अभय नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. एलएक्यूच्या काळात हे दोनही आरएफओ मुंबईत तळ ठोकून होते. त्यांनी यातील तक्रारकर्त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. (जिल्हा प्रतिनिधी) पुसद वनपरिक्षेत्रातील कारभारही वादग्रस्तच बी.के. चव्हाण हे पुसदला आरएफओ राहिले आहेत. तेव्हापासून त्यांना वरिष्ठ आयएफएसचे अभय असल्याचे सांगितले जाते. पुसदला असताना चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रात पाणलोटच्या कामात मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. खंडाळा, येलदरी येथील अवैध वृक्षतोड गाजली होती. त्याप्रकरणात वनरक्षकाला निलंबितही करण्यात आले होते. बी.के. चव्हाण यांची पुसदवरुन वाशिमला वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बदली झाली. मात्र तेथे पुसदपेक्षाही मोठा घोटाळा उघडकीस आला.