शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

इसापूर धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:33 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले पुसद तालुक्यातील इसापूर येथील धरणात यंदा केवळ १२.७५ टक्के जलसाठा आहे.

ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस : रबी हंगामाचे स्वप्न भंगणार

नंदकिशोर बंग ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंबाळपिंपरी : विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले पुसद तालुक्यातील इसापूर येथील धरणात यंदा केवळ १२.७५ टक्के जलसाठा आहे. अपुºया पावसाने जलसाठ्यात वाढ झाली नाही. परिणामी रबी व उन्हाळी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा आत्ताच मावळली आहे.उर्ध्व पैनगंगा प्रकल्प महाराष्टÑातील मोठ्या प्रकल्पापैकी एक आहे. मातीच्या बांधकामातील प्रमुख धरण असून या धरणाला ३२ वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी शेकडो हेक्टर सिंचन या धरणावरून केले जाते. परंतु यावर्षी राज्यातील सर्व धरण भरली असली तरी इसापूर धरणाची परिस्थिती मात्र बिकट आहे. या धरणाला दोन कालवे असून उजवा कालवा ११७ किलोमीटर मराठवाड्यासाठी आणि ७२ किलोमीटरचा डावा कालवा विदर्भासाठी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, हिंगोली जिल्ह्यातील कळमुनरी, वसमत, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, भोकर, अर्धापूर, मुतखेड, उमरी या तालुक्याला सिंचनाचा लाभ होतो. धरणाला १५ दरवाजे असून विविध कार्यालये नांदेड, हिंगोली आणि उमरखेड येथे आहे. या धरणाची संचय क्षमता ४४१ मीटर असून धरण निर्मितीनंतर २००२, २००६, २०१०, २०१३ मध्ये धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाला. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. या धरणात सध्या १२.७५ टक्के जलसाठा आहे. एकंदरित इसापूर धरण पाणी नसल्याने उजाड दिसत असून आगामी काळात सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण जाणार आहे.९५ हजार हेक्टर ओलित क्षेत्रइसापूर धरणाची ९५ हजार ३५ हेक्टर क्षेत्र ओलित करण्याची क्षमता आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात १५ हजार ९३७ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात १६ हजार ९०२ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात ६२ हजार १९६ हेक्टरचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात ओलिताची पिके या भागात घेतली जातात. परंतु यंदा पाणीच नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.धरणात कमीत कमी ३० टक्के जलसाठा असला तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. परंतु या धरणावर आधारित १३ पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी पुरेल. सिंचनाची चिंता असली तरी पिण्याचे पाणी मात्र मुबलक मिळेल.- डी.जी. मानेउपविभागीय अभियंता