शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन जाचाने विद्यार्थी आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:23 IST

आॅगस्ट महिन्यापासून सुरू झालेली शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्यापही विद्यार्थ्यांना छळत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून कागदपत्रांची जुळवाजुळव : विद्यार्थिनीने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, अद्यापही खात्यात पैसे आले नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आॅगस्ट महिन्यापासून सुरू झालेली शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्यापही विद्यार्थ्यांना छळत आहे. दररोज नवनवीन कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थी आॅफलाईन होत आहे. वेळ, पैसा गमावत विद्यार्थी ताणतणावात अभ्यास विसरले. याप्रक्रियेचा आलेला अनुभव एका विद्यार्थिनीने खुद्द मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून मांडला आहे. शासनाला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायचीच नाही का असा सवाल तिने केला आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून शासन मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देते. आतापर्यंत शाळा-महाविद्यालयात अर्ज भरून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत होती. परंतु अलिकडे ही शिष्यवृत्ती योजनाही आॅनलाईन झाली. विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेर तालुक्यातील एका विद्यार्थिनीला आलेला आॅनलाईन शिष्यवृत्तीचा अनुभव तिने मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून कळविला आहे.आॅगस्ट महिन्यात शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन प्रक्रियेला प्रारंभ झाला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र काढावे लागले. त्यात आठ दिवस गेले. नंतर आधार लिंकसाठी विद्यार्थी सेतू सुविधा केंद्रांसमोर रांगा लावून बसले. सकाळी ६ वाजतापासून रांगेत उभे रहायचे आणि १० वाजता केंद्र उघडले जायचे. तेथेही प्रचंड गर्दी. शाळा, महाविद्यालय सोडून येथे विद्यार्थी रांगेत असायचा त्यानंतर ओटीपी नंबर येण्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागली. प्रतिज्ञालेखासाठी तीन-चार दिवस झुलत होता. उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक ही कागदपत्रे लिंक करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात आॅनलाईन प्रिंट काढण्यासाठी दिली. एका दिवसात मिळणाºया प्रिंटसाठी पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागली.तब्बल चार महिन्यापासून शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी ताण घेऊन भटकत आहे. शाळा, महाविद्यालय बुडवत आहे. शहरी भागातील सोडा गावखेड्यातून येणाºया विद्यार्थ्यांना काय यातना झाल्या असतील हे केवळ तोच सांगू शकतो. एवढे होऊनही अद्यापर्यंत शिष्यवृत्ती मात्र अधांतरीत आहे.एक प्रमाणपत्र देत नाही तो दुसऱ्यासाठी सूचनाआॅनलाईन फॉर्म भरून सबमिट करण्यासाठी विद्यार्थी आपल्या शाळा, महाविद्यालयात एक पानाची प्रिंट घेऊन गेले. परंतु तेथे सांगितले चार पानाची प्रिंट हवी. विद्यार्थी पुन्हा सेतू सुविधा केंद्रात. त्यासाठी दोन दिवस लागले. त्यातही अनेकांच्या प्रिंटमध्ये चुका होत्या. या चुका दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा सेतू केंद्र शोधावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आता आपली सुटका झाली असे विद्यार्थ्यांना वाटत असतानाच सूचना आली स्कॉलरशिपच्या अर्जासोबत रेशनकार्डची झेरॉक्स जोडावी. एवढेच नाही तर भावंडे शिकत आहे की नाही याचे प्रतिज्ञालेख देण्यास सांगितले. यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची वेळ आली. एवढे सर्व होऊनही अद्यापपर्यंत कुणाच्याही खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे आले नाही.