शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन हजेरीचा उलटफेरा

By admin | Updated: January 26, 2017 00:54 IST

ठरले असे होते की, शिक्षकांची हजेरी जिल्हा परिषदेत रोज ई-मेलवर पाठवायची. पण झाले उलटेच.

अधिकारी हतबल : पंचायत समित्यांकडून ई-मेलऐवजी जिल्हा परिषदेतून पत्रे यवतमाळ : ठरले असे होते की, शिक्षकांची हजेरी जिल्हा परिषदेत रोज ई-मेलवर पाठवायची. पण झाले उलटेच. शाळांनी आॅनलाईन हजेरी तर पाठवलीच नाही; उलट जिल्हा परिषदेला मात्र दररोज शाळांना स्मरणपत्रे पाठवावी लागत आहेत. पंचायत समित्यांकडून दररोज ई-मेल येण्याऐवजी जिल्हा परिषदेतून दररोज पत्रे पाठविण्याचा उलटफेरा सुरू आहे. शिक्षकांचे हजेरी रजिस्टर दररोज ई-मेलवर पाठविण्याचे आदेश जानेवारीच्या प्रारंभीच देण्यात आले होते. ७ जानेवारीला याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा आदेश सर्व पंचायत समित्यांना प्राप्तही झाला. परंतु, अनेक गावांमध्ये इंटरनेटची रेंज नाही, शिक्षकांवरच का अविश्वास दाखवता, असे मुद्दे उपस्थित करीत शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध दर्शविला. ज्या घाटंजी पंचायत समितीमधील शिक्षकांनी सर्वात आधी सभा घेऊन हा निर्णय धुडकावला, तेथील एकाही शाळेने अद्यापही आॅनलाईन हजेरी पाठविलेली नाही. इतर पंचायत समित्यांमधील शिक्षकांनी हजेरी रजिस्टरचा फोटो आॅनलाईन पाठविण्याबाबत उदासीनताच दाखविलेली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दररोज पंचायत समित्यांना याबाबत स्मरणपत्रे पाठवावी लागत आहेत. हजेरीपट पाठविण्याची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची आहे, मात्र स्मरणपत्रे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलवर धडकत आहेत. ९, १०, ११ आणि १२ जानेवारी अशा सलग चार दिवसात चार स्मरणपत्रे जिल्हा परिषदेने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी) कारवाईपेक्षा उत्तम काम करवून घेणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. हळूहळू सर्वच पंचायत समित्यांमधून हजेरी आॅनलाईन येण्याचे काम सुरू होत आहे. कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी एका दिवसात होत नाही. लवकरच सर्व पंचायत समित्या हजेरी पाठवतील. - डॉ. सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी