शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात शिष्यवृतीचे आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:05 IST

राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाची स्पष्टोक्ती : ३१ आॅगस्टनंतरही अर्ज स्वीकारले जातील

यवतमाळ : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे. या आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक कनेक्ट करण्याचे आदेश आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्रावर शेकडो विद्यार्थ्यांची झुंबड दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गोंधळामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. ३१ आॅगस्ट ही शिष्यवृत्तीसाठी आधार अपडेशनची शेवटची तारीख नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आणि गर्दी न करता, नियमानुसार आपले आधार अपडेशन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक जोडणे गरजेचे आहे. आणि यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव केंद्र सुरू आहे. या ठिकाणी सकाळी बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म देण्यात येते आणि नंतर तेवढ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारल्या जाते. परंतु ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांनी दोन-तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता गोंधळ पाहता अखेरीस जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता. काही महाविद्यालयांनीसुद्धा कोणतीही शहानिशा न करता महाविद्यालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालया पाठविणे सुरू केले आहे. तर काही विद्यार्थी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थी संख्या पाहता, जिल्ह्यात त्वरित आधार केंद्र वाढविण्याची मागणी केली होती.याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्याशी संपर्क साधला असता. ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख नसल्याने स्पष्ट करण्यात आले असून वरिष्ठांकडून आम्हाला तशी तारीख कळविल्यानंतर ती सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.तीनशे ते चारशे विद्यार्थी एकाचवेळी येत आहेत, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. प्रत्येकाला आम्ही टोकण दिले आहे. एकच सेंटर सुरू आहे. जास्तचे सेंटर आत्ताच सुरू करणे शक्य नाही. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी असेल तर प्राचार्यांनी आमच्यासोबत संपर्क साधणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही, ३१ आॅगस्ट ही शेवटची तारीख असल्याचे शासनाने कुठेही म्हटलेले नाही.- नरेंद्र फुलझेलेनिवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ