शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेसाठी चक्क एक हजार उमेदवार

By admin | Updated: December 22, 2015 03:45 IST

जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी २७ डिसेंबरला तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या

यवतमाळ : जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी २७ डिसेंबरला तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या परीक्षेकरिता २४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. २३ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एका जोगसाठी एक हजार उमेदवार परीक्षा देणार आहे. उच्चशिक्षित उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. या पदभरतीमध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील २५ जागा आणि अनुसूचित क्षेत्रातील ३ जागांसाठी परीक्षा होणार आहे. तलाठीपदासाठी पदवीपर्यंत शिक्षणाची अट आहे. प्रत्यक्षात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एमए, अभियांत्रिकी आणि बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. एका जागेसाठी सरासरी एक हजार विद्यार्थी स्पर्धा करणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा कस लागणार आहे.मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परीक्षेकरिता १० तालुक्यांत केंद्र देण्यात आले आहे. यामध्ये यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, केळापूर, वणी, बाभूळगाव आणि आर्णी तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. या तालुक्यातील ८० केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. ५०० वर्गखोल्या निश्चित करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी १६०० कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती आहे. तालुका समन्वयक, ३८ केंद्र प्रमुख इतर कर्मचारी मदतीला आहे. (शहर वार्ताहर)४६ लाखांचा महसूल४परीक्षेसाठी मागासवर्गीय उमेदवाराला १५० रूपयांचा धनादेश तर खुल्या प्रवर्गासाठी ३०० रूपयांच्या धनादेशाची अट ठेवण्यात आली होती. यातून प्रशासनाच्या तिजोरीत ४६ लाख रूपयांच्या महसुलाची भर पडली आहे.