शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांचे एक पाऊल मागे

By admin | Updated: June 6, 2014 00:11 IST

विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक

आश्रयदाताच गेला : भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते वार्‍यावर यवतमाळ : विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक निष्ठावंतांनी बंडखोरीची तयारीही केली होती. परंतु आश्रयदाताच गेल्याने आता बंडखोरांनीही एक पाऊल मागे घेतले आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंडेंची येथे नेते-कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही. मात्र गडकरी गटाच्या ‘कर्मशियल’ राजकारणाने त्रासलेल्या निष्ठावंत व हाडाच्या कार्यकर्त्यांना मुंडेंचाच खरा आधार वाटत होता. पक्षासाठी झटणार्‍या, पक्ष उभा करणार्‍या सामान्य कार्यकर्त्याला महत्वाची पदे, निवडणुकांच्या तिकिटा, लालदिवे देण्यासाठी मुंडेंचा नेहमीच आग्रह होता. नेमकी या उलट स्थिती सध्या विदर्भात आहे. भाजपात कंत्राटदार, बिल्डर, कमिशन एजंट, प्रॉपर्टी ब्रोकर, डेव्हलपर्स, व्यापारी यांचीच चालती असल्याचे कार्यकर्ते बोलतात. त्यांनाच कित्येक वर्षांंपासून निवडणुकांमध्ये तिकिटे दिली जात आहे. तेच ते चेहरे पुढे येत आहे. त्यामुळेच भाजपात नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज वाढली आहे. निष्ठावंतांनी या कर्मशियल राजकारणापायी घरी बसणे पसंत केले. घरी बसलेली ही निष्ठावंत मंडळी केवळ मुंडेंच्या नेतृत्वाकडे पाहूनच अद्याप भाजपात आहे. परंतु आता मुंडे गेल्याने ही कार्यकर्त्यांंची फळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीत यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात भाजपातून बंडखोरी करण्याची तयारी केली गेली. यवतमाळात तर प्रमुख दोन दावेदार त्या तयारीत होते. त्यांनी मतदारसंघात संपर्क अभियानही सुरू केले. परंतु आता आश्रय देणारे गोपीनाथ मुंडेच जगात नसल्याने बंडखोरी कुणाच्या भरोश्यावर करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळेच या संभाव्य बंडखोरांनी एक पाऊल मागे घेत तूर्त  जैसे थे राहण्याची भूमिका घेतली आहे. मुंडेंना नेहमीच ‘मासबेस’ कार्यकर्त्यांंची साथ लाभली आहे. सध्या भाजपात मात्र ‘मासलेस’ कार्यकर्त्यांंची चालती आहे. मुंडेंचा विदर्भात हस्तक्षेप नसला तरी ते यवतमाळसह विदर्भातील कार्यकर्त्यांंवर नेहमीच लक्ष ठेऊन राहायचे. येथील अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. जातीय समीकरणे, कार्यकर्त्यांंमधील पोटेन्शीयल, त्यांचा कुठे कसा उपयोग करून घ्यायचा याचा अभ्यास मुंडेंना होता. फाटक्या कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून मुंडेंची ओळख होती. मात्र आता गोपीनाथ मुंडे हयात नसल्याने हे तमाम सामान्य कार्यकर्ते वार्‍यावर सुटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या निष्ठावंतांचा कल कुणाकडे राहतो यावर युतीचे गणित बरेच अवलंबून राहणार आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)