शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दर दिवसाला एक कोटी लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यतिरिक्त अतिरिक्त नळ जोडण्यासाठी तीन हजार नागरिकांनी अर्जांची उचल केली आहे.

ठळक मुद्दे२५ कोटींची थकबाकी : ३९ हजारपैकी सहा हजार जोडण्या अनधिकृत, नगरपरिषदेकडे साडेपाच कोटी थकले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलसाठ्यामध्ये पाण्याचा थेंब न् थेंब साठविला जातो. त्याच पाण्याचे वितरण होताना यवतमाळात दररोज किमान एक कोटी लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ठिकठिकाणी खोदकामामुळे पाईपलाईन जागोजागी फुटणे, अवैध नळ जोडण्या, सार्वजनिक ठिकाणी नळाला तोट्या नसणे, पाईपलाईन डॅमेज या प्रकारामुळे प्राधिकरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यातून प्राधिकरणाचे लाखोंचे नुकसान झाले. सामान्यांना मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या ग्रामपंचायतींना विलीन करण्यात आले आहे. यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर सर्वाधिक जबाबदारी येऊन ठेपली आहे. जीवन प्राधिकरणाने ३९ हजार नागरिकांना नळ जोडण्या दिल्या आहेत. यावरून दोन लाख ४० हजार नागरिकांची तहान भागविली जाते. या व्यतिरिक्त अतिरिक्त नळ जोडण्यासाठी तीन हजार नागरिकांनी अर्जांची उचल केली आहे. त्या नळ जोडण्या प्रलंबित आहे.शहराला दर दिवसाला तीन कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यातील ३० टक्के पाण्याची गळती होते. त्यात सर्वाधिक गळती पाईप फुटल्याने होत आहे. वितरित झालेल्या पाण्यापैकी एक कोटी लिटर पाणी गळतीच्या माध्यमातून वाहून जाते. यातून पाणी टंचाईसारख्या स्थितीचा अनेक प्रभागांना सामना करावा लागतो.पाणी वितरण व्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडे संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही व्यवस्था हाताळताना जीवन प्राधिकरणाला वर्षाकाठी ११ कोटी रूपयांचा खर्च येतो. यातील सहा कोटी ७५ लाख रूपयांचा निधी वीज बिलावर खर्च होतो. पाईपलाईनची दुरूस्ती आणि इतर कामासह वेतनावर इतर निधी खर्च होतो. यातून प्राधिकरणाचा गाडा चालत आहे. अशा स्थितीत शासकीय कार्यालय आणि सर्वसामान्य ग्राहकांकडे तब्बल २५ कोटी रूपयांचे पाणी बिल थकले आहे. त्यामध्ये टीबी हॉस्पिटल आणि नगरपरिषदेच्या थकबाकीचा समावेश आहे. नगरपरिषदेकडे सार्वजनीक नळ जोडण्यांचे तब्बल साडेपाच कोटी रूपयांचे पाणी बिल थकले आहे.जीवन प्राधिकरणाची नवीन पाईपलाईन बसविताना अवैध नळ जोडण्या उघडकीस येत आहे. शहरात अशा तब्बल सहा हजार नळ जोडण्या अनधिकृत असल्याचे आत्तापर्यंत उघड झाले आहे. यापैकी साडेतीन हजार नळ जोडण्या नियमित करण्यात आल्या आहेत.२२५ सार्वजनिक नळ जोडण्या बंद होणारजीवन प्राधिकरणाचा संपूर्ण जोर नळ जोडण्यावर राहणार आहे. प्रत्येक नळ ग्राहकाकडून पाणी कर वसूल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणावरून हजारो लिटर पाणी वाया जाते. शहरात असे आणखी २२५ कनेक्शन आहेत. त्याला आता बंद केले जाणार आहे.पाण्याचा मोठा अपव्यय, दुरुस्तीसाठी धावाधावशहरात प्राधिकरणाची पाईपलाईन बदलविण्याचे काम सुरू आहे. भूमिगत नाल्या आणि दूरसंचार विभाग व वीज वितरणच्या भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदकाम केले जात आहे. यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहे. यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. या दुरूस्तीसाठी प्राधिकरणाला दररोज धावाधाव करावी लागत आहे.नागरिकांनी पाणी बिलाची थकबाकी भरावीजनसामान्यांसह शासकीय शासकीय कार्यालयांनी थकबाकीचा भरणा करून प्राधिकरणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. पाण्याचा अपव्यय करू नये. अनाधिकृत नळ जोडण्याधारकांनी त्या अधिकृत करवून घ्याव्यात.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळनळ जोडणी करताना खोलीकरणाचे नियमपाण्याच्या टाकीपासून मुख्य पाईपलाईन किती खोलवर असावी आणि पाईपलाईनपासून नळ जोडणी किती खोलवर असावी, याबाबत नियम आहे. तथापि नियम पाळलेच जात नाही. त्यामुळे वारंवार पाईपलाईन, नळ जोडण्या तुटतात. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.- राजेश सावळे, वरिष्ठ भू-वैज्ञानिक, जल तज्ज्ञ.

टॅग्स :Waterपाणी