शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एकस्तरचा लढा आयुक्तांकडे

By admin | Updated: September 21, 2016 02:07 IST

आदिवासी-नक्षलग्रस्त तालुक्यातील शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी अचानक बंद झाली. या अन्यायाविरोधात अखेर मंगळवारी शिक्षकांनी थेट

‘इब्टा’ची धडक : सहा तालुक्यातील शिक्षकांच्या आशा पल्लवीत यवतमाळ : आदिवासी-नक्षलग्रस्त तालुक्यातील शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी अचानक बंद झाली. या अन्यायाविरोधात अखेर मंगळवारी शिक्षकांनी थेट विभागीय आयुक्त जे. सी. गुप्ता यांच्याकडे धाव घेत दाद मागितली. ग्रामविकास मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी मिळाले.वणी, मारेगाव, झरीजामणी, घाटंजी, पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. नक्षलग्रस्त भागात काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून ही वेतनश्रेणी मिळते. जिल्ह्यात जवळपास तीन हजार शिक्षक या वेतनश्रेणीचे लाभार्थी आहेत. शिवाय, जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणारे आरोग्य कर्मचारीही ही वेतनश्रेणी घेत होते. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला यांनी अचानक आदेश काढून ही वेतनश्रेणी बंद केली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अमरावती, गडचिरोली, पालघरसारख्या बऱ्याच जिल्ह्यातील शिक्षकांना अजूनही एकस्तरचा लाभ मिळत आहे. मग यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनाच त्यातून का डावलण्यात आले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सीईओंचा निर्णय कळताच हादरलेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली. मात्र, वारंवार चकरा मारूनही त्यांना दाद मिळाली नाही. त्यामुळे इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनने मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच एकस्तर वेतनश्रेणी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. याबात आपण ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्तांशी चर्चा करताना इब्टाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत, जिल्हा कार्यवाह संजय फुलबांधे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद चांदूरकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)