शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पीएम किसान योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एक लाख शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र तसेच नॅशनल इन्फार्मोटिक सेंटर यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने चालविले जाते. सुरुवातीला कृषी सहायक व तलाठी यांची मदत घेण्यात आली. मात्र, नंतर या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी योजनेच्या कामावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३६ हजार ६६६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली.

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने योजनांचे अत्याधुनिकीकरण केले आहे. एखादी यंत्रणा ऑनलाईन प्रणालीवर उभी राहिल्यास ती कशी सुरळीत राहते, याचे उदाहरण प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना आहे. कृषी व महसूल विभागाच्या बहिष्कारानंतरही तीन लाख ३६ हजार ६६६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नियमित मिळत आहे. एक लाख १६ हजार शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यांच्यासाठी ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर हा पर्याय उपलब्ध आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र तसेच नॅशनल इन्फार्मोटिक सेंटर यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने चालविले जाते. सुरुवातीला कृषी सहायक व तलाठी यांची मदत घेण्यात आली. मात्र, नंतर या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी योजनेच्या कामावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३६ हजार ६६६ शेतकऱ्यांची नोंदणी झाली. त्यांना योजनेचा लाभ मिळाला. यातील एक लाख दोन हजार शेतकऱ्यांना दहावा हप्ताही प्राप्त झाला आहे. ही संख्या एकूण शेतकऱ्यांच्या ३४ टक्के आहे. तर योजनेचा नववा हप्ता घेणारे शेतकरी दोन लाख २१ हजार आहे. त्यांची संख्या ६५ टक्के आहे. एक लाख १६ हजार शेतकरी अजूनही पीएम किसान योजनेपासून दूर आहेत. त्यांच्यासाठी ई सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर हा पर्याय आहे. येथे जाऊन ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात. कृषी व महसूल कर्मचाऱ्यांच्या बहिष्काराच्या पवित्र्यामुळे या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र, उर्वरित योजना वर्षभरापासून सुरळीत सुरू आहे. हे ऑनलाईन प्रणालीचे यश मानले जात आहे. नोकरदार संघटना बरेचदा आपले हक्क व प्रलंबित मागण्यांसाठी अनेक कामांवर बहिष्कार घालतात, संप पुकारतात. अशा स्थितीतही ऑनलाईन प्रणाली सर्वसामान्यांसाठी सेवा देण्याचा चांगला पर्याय ठरत आहे. हे पीएम किसान योजनेच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सेवेतून दिसून येते.

घाटंजीत शिबिरही टाळले, शेतकरी तहसीलवर धडकले

घाटंजी : २५ मार्च रोजी पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी राज्यभर शिबिर घेण्याचे शासनाचे आदेश होते. मात्र घाटंजी तालुक्यात असे शिबिरच घेण्यात आले नाही. त्यामुळे वंचित शेतकरी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडकले. महसूल व कृषीच्या मानापमान नाट्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. शिरीष गिरी, मोहन प्रधान, नामदेव निमनकार, पांडुरंग भोयर, कृष्णराव शिंगेवार, शेख चाँद कुरेशी, अवधूत चाैरागडे, नागोराव सावसाकडे, लक्ष्मण गिरी, कमला फुसे, मीराबाई बोरपे, सुरेंद्र हाडगे, जीवन चाैरागडे, सुभद्रा निमनकार आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना