शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:07 IST

तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमहागाव, फुलसावंगीची घटना : अमरावतीच्या तरुणाचा गेला बळी

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/फुलसावंगी : तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकी गतिरोधकावरून उसळून झालेल्या अपघातात अमरावतीचा तरुण ठार झाला. तर टो करून जाणारी कार उभ्या ट्रॅक्टरवर आदळली. त्यात दोन जण जखमी झाले आणि ऊस भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली महागाव शहरात उलटली.सुमितसिंह अजयसिंह ठाकूर (२८) रा. अमरावती असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे. तो आपला मित्र जितेंद्र ओंकारसिंग ठाकूर (३१) रा. अमरावती याच्यासोबत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे जात होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास फुलसावंगीजवळील गतिरोधकावर दुचाकी उसळली आणि त्यात सुमितसिंह जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच रात्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दुसरा अपघात उमरखेड-महागाव रस्त्यावर सुकळी गावाजवळ मंगळवारी सकाळी घडला. टो करून जाणारी सॅन्ट्रोकार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यात बंटी इंगळे (१९) रा. महागाव असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो कार चालवित होता. त्याला प्रथम उमरखेड येथे आणि नंतर नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर टाटा मॅजिक चालक राजू गावंडे किरकोळ जखमी झाला. टाटा मॅजिक वाहनाला ही कार बांधून नांदेड येथे घेऊन जात होते.तिसरा अपघात महागाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर घडला. सोमवारी रात्री ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.