शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया अर्धवट राहिलेल्यांना एक दिवसाची मुदतवाढ

By admin | Updated: November 19, 2015 03:07 IST

जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी अर्जाचा पाऊस पडत असताना सर्व्हर डाऊन झाले. अनेक उमेदवारांची प्रक्रिया अर्धवट राहिली,...

नोकरभरती : जिल्हा परिषद सर्व्हर कासवगतीने, १९५ पदांसाठी अर्जांची संख्या पोहोचली ९० हजारांवर यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी अर्जाचा पाऊस पडत असताना सर्व्हर डाऊन झाले. अनेक उमेदवारांची प्रक्रिया अर्धवट राहिली, अशा उमेदवारांना आता एक दिवसाची मुदतवाढ अर्ज सादर करण्यासाठी देण्यात आली आहे. मात्र या एका दिवसात ही प्रक्रिया पूर्ण कशी होईल, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या १५ संवर्गातील १९५ जागांसाठी नोकरभरती घेतली जात आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर ही आहे. परंतु गत आठवडाभरापासून नोकरभरतीचा सर्व्हर डाऊन झाला आहे. तासन्तास सायबर कॅफेत बसून अर्ज अपलोड होत नाही. सलग तीन दिवसांपासून ही प्रणाली हँग होती. बुधवारी ड वर्गातील पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला. एकाच वेळी गर्दी उसळल्याने ही सिस्टीम संथ झाली. त्याचा अनेकांना फटका बसला. अनेक उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्ध्यावर थांबली आहे. लिंक मिळत नसल्याने उमेदवार सैरभैर झाले आहे. आपला अर्ज दाखल होणार की नाही, अशी भीती त्यांना निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेने अर्धवट प्रक्रिया राहिलेल्या उमेदवारांना एक दिवस मुदतवाढ दिली असून अशा उमेदवारांना २० नोव्हेंबर अर्ज दाखल करता येणार आहे. (शहर वार्ताहर)अर्जांचा पाऊस जिल्हा परिषदेच्या १९५ जागांसाठी तब्बल ९० हजार उमेदवारांनी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल केल्याची नोंद आहे. यामध्ये ड प्रवर्गातील पदांसाठी सर्वाधिक अर्ज आहे. दोन दिवसात आणखी ४० हजारांवर अर्ज येण्याची शक्यता आहे. या अर्जांची छानणी आणि परीक्षा घेण्याचे दिव्य जिल्हा प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे. नोकरभरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर आहे. अशा स्थितीत प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांचे अर्ज अर्धवट राहिले आहे. त्या उमेदवारांना डाटा अपलोड करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ