शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटींची घरकुले लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:37 IST

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : दोन वर्षात एकही घरकूल मंजूर नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ९३ ग्रामपंचायती आहे. या सर्व गावांना सामान्य प्राथमिक यादी प्रमाणे घरकूल योजनेचा लाभ मिळाला. परंतु सुकळी जहागीर, अमानपूर, चिल्ली या तीन गावातील लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून एकही घरकूल मिळाले नाही. तीन गावातील सुमारे १०० घरकुलाचे फाईल सामान्य प्राथमिक यादीप्रमाणे गतवर्षी मंजूर झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. परंतु अद्याप एकाही लाभार्थ्याला घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. सुकळी, अमानपूर, चिल्ली हे गाव आॅनलाईन र्फोमेशन न झाल्यामुळे तुमचे घरकूल मंजूर नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जाते.गत १५ वर्षापूर्वी सुकळी, चिल्ली व अमानपूर ही तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत होती. त्यानंतर विभाजन झाले. तीनही गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. परंतु तेव्हापासून आजपर्यंत या गावांची आॅनलाईन नोंदच केली नाही. त्यामुळे लाभार्थी घरापासून वंचित आहेत. प्रशासनाने सुधारणा करून तीनही गावांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे.उपोषणाचा इशारागत दोन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे. १५ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सुकळीचे माजी सरपंच चुन्नुमिया जागीरदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिले आहे. गावकरी हक्काच्या घरकुलापासून वंचित असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.