शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पांढरकवडा पालिकेला एक कोटीचा पुरस्कार

By admin | Updated: May 6, 2017 00:17 IST

नगरविकासाच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेने अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

अमरावती विभागातून द्वितीय : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत दिला पुरस्कार तालुका प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : नगरविकासाच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेने अमरावती विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. एक कोटी रूपयांचा हा पुरस्कार व प्रशस्तीपत्र गुरूवारी मुंबई येथील यशवंतराव प्रतिष्ठाण येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा वंदना रॉय व मुख्याधिकारी अशोक गराटे यांनी स्विकारला. यावेळी नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार राजू तोडसाम, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, आयुक्त विरेंद्र सिंग, सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. नगराध्यक्षा वंदना रॉय व मुख्याधिकारी अशोक गराटे यांचा देखील यावेळी स्वतंत्र प्रशस्तीपत्र देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वच्छता अभियानाचे माध्यमातून पांढरकवडा नगरपरिषदेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्पन्न वाढविणे आणि अंतर्गत व्यवस्थापनातही चांगले काम केले. या कार्याची दखल घेत अमरावती विभागाचा व्दितीय क्रमांकाचा एक कोटी रूपयांचा पुरस्कार पांढरकवडा नगरपरिषदेला घोषित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळण्यासाठी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा असून नागरिकांच्या सहकाऱ्यामुळेच हे शक्य होऊ शकले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा वंदना रॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.