शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटींच्या कामावर एकच एजंसी कन्सलटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 21:50 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील ५०० कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाचे कन्सलटन्सीचे कंत्राट या निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंपनीला देण्यात आल्याने ही बाब सिद्ध झाली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय रस्ते निधी : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम विभाग एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील ५०० कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाचे कन्सलटन्सीचे कंत्राट या निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंपनीला देण्यात आल्याने ही बाब सिद्ध झाली आहे.जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे पांढरकवडा, यवतमाळ, पुसद व विशेष प्रकल्प हे चार विभाग आहे. या विभागांतर्गत केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे हाती घेतली गेली आहे. या कामांच्या सर्वेक्षण, अंदाजपत्रकाची जबाबदारी रस्ते प्रकल्प विभागावर (आरपी) असणे बंधनकारक आहे. मात्र या विभागाला साईड ट्रॅक करून ५०० कोटींच्या या सीआरएफमधील कामाचे सर्वे, इस्टीमेटची जबाबदारी सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे. अलिकडेच ही कंपनी रजिस्ट्रर्ड करण्यात आली. या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची कामे या कंपनीला दिली गेल्याचे सांगितले जाते.पूर्वी सुशिक्षित बेरोजगार अभियंते हे सर्वे, इस्टीमेटची कामे करीत होती. परंतु आता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते मेहेरबान झाल्याने ही सर्व कामे निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंपनीला देण्यात आली आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम उरलेले नाही. बांधकाम अभियंत्यांच्या या कारभाराबाबत बेरोजगार अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत आहे. कन्सलटंटवर मेहेरबान होण्याची सुरुवात बांधकामच्या यवतमाळ विभागाकडून झाली होती. नंतर त्याची अंमलबजावणी पुसद, पांढरकवडा व विशेष प्रकल्प विभागात केली गेली.सुरुवातीला ही कामे कनिष्ठ अभियंता स्तरावर केली जायची, नंतर ती सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडे देण्यात आली. आता तर ही कामे त्यांच्याकडून काढून घेऊन बांधकाम खात्याच्याच जुन्या अभियंत्याला कन्सलटंटच्या नावाखाली सोपविण्यात आली. या कारभारामुळे प्रमुख अभियंत्यांविरुद्ध रोष पहायला मिळतो आहे.राजकीय मेहेरबानी सांभाळण्यातही बांधकाम अभियंते फेल ठरत आहे. केंद्रीय आशीर्वादाने प्रमुख अभियंता येथे रुजू झाले असले तरी राज्य सरकारच्या येथील मंत्र्यांमध्ये नाराजी कायम असल्याचे सांगितले जाते. या नाराजीचा फटका कुणाला किती बसतो हे वेळच सांगेल.सार्वजनिक बांधकामच्या निधीत घटसार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाचा मुंबईत योग्य ‘अ‍ॅप्रोच’ नसल्याने जिल्ह्याला मिळणाऱ्या विकास निधीतही बरीच घट झाल्याची माहिती आहे. शासनाच्या ०४०३ हे लेखाशिर्षावर अकोला-अमरावती जिल्ह्याला प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असताना यवतमाळ जिल्ह्याला मात्र अवघ्या एक ते दीड कोटींच्या निधीवर समाधान मानावे लागले. निधीअभावी आजही जिल्ह्यात कंत्राटदारांची ५० कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग