शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर पुन्हा एकदा ‘ग्रामीण’ वकिलांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:21 PM

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.

ठळक मुद्दे२८ मार्चला मतदान माजी अध्यक्ष आशीष देशमुखांसह विदर्भातून १५ जण मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. २०१० पर्यंत केवळ महानगरीय वकिलांचा चेहरा असलेली बार कौन्सिल पुसदच्या अ‍ॅड. आशीष देशमुख यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीनंतर सर्वप्रथम ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातून बार कौन्सीलवर २५ प्रतिनिधींचे बोर्ड निवडून जाणार आहे. त्यासाठी येत्या २८ मार्च रोजी मतदान होऊ घातले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून २२ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. २३ व २४ रोजी अर्जांची छाननी करून १ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.मोठी परंपरा लाभलेली बार कौन्सिल महानगरीय वकीलांपुरतीच मर्यादित होती. मात्र, २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच २५ पैकी १९ प्रतिनिधी हे ग्रामीण भागातील वकिलांमधून विजयी झाले. त्यातही पुसदसारख्या गावात वकिली करणारे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी थेट अध्यक्षपदावर झेप घेतल्याने यावेळी ग्रामीण वकिलांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळेच सोमवारपर्यंत महाराष्ट्रातून एकंदर ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर अंतिम तारखेपर्यंत अर्जांचा आकडा २०० पार पोहोचेल, असा दावा जाणकारांनी केला आहे.ग्रामीण वकिलांचे आधिक्य असलेल्या २०१० च्या बार कौन्सिलने इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळकडे अध्यक्षपद सोपविले होते. अ‍ॅड. देशमुख यांच्या कारकीर्दीने प्रत्येक वकिलाच्या मनात सुरक्षिततेची भावना जागविली. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने कोर्ट फी वाढविली, त्यावेळी वकिलांमध्ये खळबळ उडाली होती. परंतु, अ‍ॅड. देशमुख यांनी विधी मंत्रालयापासून जिल्हा न्यायाधीशांपर्यंत पाठपुरावा करून या शुल्क वाढीला स्थगिती मिळविली आहे. त्यामुळेच जिल्हा बार असोसिएशनसह तालुका पातळीवरील सर्व वकिलांनी देशमुख यांच्या उमेदवारीला पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर केला असून त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदानाची तारीख उमेदवारांची गर्दी लक्षात घेता सध्या प्रत्येक जिल्ह्यातील वकील प्रचाराच्या कामात मग्न आहेत.असे होणार मतदानबार कौन्सिलच्या निवडणुकीत महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर, हवेली, दीव, दमण येथील एकंदर १ लाख १४ हजार वकील मतदार आहेत. नियमानुसार, पूर्वीच्या मंडळाचा कार्यकाळ २०१५ मध्येच संपला. मात्र ‘बोगस वकील’ शोधण्याचा मुद्दा ऐरणीवर आल्याने दोन वर्ष निवडणूक घेण्यात आली नाही. आता मतदार यादीतील ‘बोगस’ नावे, मृत वकिलांची नावे वगळून सुधारित यादी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करताना पसंतीक्रम द्यायचा आहे. १ ते २५ पर्यंत हा पसंतीक्रम देता येतो. परंतु, किमान १ ते ५ पसंतीक्रम देणे बंधनकारकच आहे.विदर्भातील उमेदवारयवतमाळ - अ‍ॅड. आशीष देशमुखअमरावती - अ‍ॅड. सुमित घोडेस्वार, अ‍ॅड. ऋषिकेश भुजाडे, अ‍ॅड. प्रवीण पाटीलनागपूर - अ‍ॅड. आसीफ कुरेशी, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. संग्राम शिवपूरकर, अ‍ॅड. अनिल गोवरदिवे, अ‍ॅड. संदीप चार्लावार, अ‍ॅड. पारिजात पांडेअकोला - अ‍ॅड. मोतीसिंग मेहता, अ‍ॅड. बी. के. गांधीभंडारा - अ‍ॅड. किशोर लांजेवारकारंजा - अ‍ॅड. नीलेश बोरकर 

टॅग्स :Electionनिवडणूक