शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

तेलबिया साठवणूक आदेशाने गोंधळाची स्थिती

By admin | Updated: October 27, 2015 02:53 IST

बाजारपेठेत टंचाईसदृश स्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने २०१० च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याच्या

यवतमाळ : बाजारपेठेत टंचाईसदृश स्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने २०१० च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये डाळीसोबत तेलबिया साठवणुकीचे निकष देण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये तेलबिया साठवणुकीसाठी ३०० क्विंटलची मुुभा आहे. सोयाबीन खरेदी हंगामात लागलेले निकष व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. या गोंधळाच्या स्थितीत सोयाबीनचे दर मात्र क्विंटलमागे ३०० रूपयांनी घटले. व्यापारी आणि शासनाच्या भांडणात शेतकऱ्यांना जबर नुकसान सोसावे लागत आहे. सध्याचे शेतमालाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे शेतकऱ्यांची दरवाढीची मागणी होती. प्रत्यक्षात साठेबाजीच्या आदेशाने व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदीतून हात आवरता घेतला आहे. परिणामी सोयाबीनचे दर ३९०० रूपये क्विंटलवरून ३७२० रूपयांपर्यंत घसरले. तब्बल २०० रूपयांची घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.हर्रास थांबल्याने तणावराज्य शासनाच्या नवीन आदेशाने व्यापाऱ्यांना तेलबियाची साठवणूक करता येणार नाही. हंगामात प्रत्येक बाजारपेठेत मोठी आवक राहणार आहे. अशा स्थितीत सरकारच्या धोरणाने खरेदीवर बंधन येणार आहे. मग इतर शेतकऱ्यांचा माल खरेदी कोण करणार यासंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी करीत होेते. या प्रकरणात प्रशासकाच्या मध्यस्थीनंतर पुन्हा लिलाव सुरू झाला. यामुळे तणाव निवळला. या प्रकरणात व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अडचणी मांडल्या आणि धान्य खरेदीतील अडथळा दूर करण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. (शहर वार्ताहर)