शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

तेल विक्रेत्या महिलांचा रस्त्यावर धुमाकूळ

By admin | Updated: October 7, 2014 23:41 IST

येथील वर्दळीच्या व बाजार भरणाऱ्या रस्त्यावरच नागपूर येथील एका महिलेने वाताचे तेल विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहचले.

नेर : येथील वर्दळीच्या व बाजार भरणाऱ्या रस्त्यावरच नागपूर येथील एका महिलेने वाताचे तेल विक्रीचे दुकान थाटले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. सदर प्रकार वाहतूक पोलिसांना कळताच ते घटनास्थळी पोहचले. यावेळी या महिलेने पोलिसांनाच शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. नेर येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. आजही तो भरला होता. नागपूर येथील वातनाशक तेल विकणाऱ्या लता प्रमोद भुते (५०) व तिचा जावई गोविंद प्रेमसिंग चव्हाण व चार मुली आपल्याकडील तेल विकण्यासाठी मारोती ओमनी या कारने आले होते. त्यांनी दुपारच्या सुमारास वर्दळीच्या रस्त्यातच दुकान थाटून तेलविक्री सुरू केली. यामुळे दुतर्फा रस्त्यावरील जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक खोळंबली. हा प्रकार थांबविण्यासाठी ठाणेदार गणेश भावसार व जमादार हरिचंद्र कार हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर तेल विक्रेत्यांना आपले वाहन बाजुला घेण्याची सूचना केली. मात्र ही सूचना धुडकावून लावत या महिलेने ठाणेदारांच धारेवर धरले. तिच्या सोबत असलेला जावाईसुद्धा ठोणदारावर चढला आणि भर रस्त्यात वर्दी उतरविण्याची धमकी देऊन शिवीगाळ करू लागला. इथे हा प्रकार सुरू असतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांची रांग मात्र वाढतच होती. अखेरीस पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेण्याची तयारी चालविली. आता आपले काही खरे नाही हे लक्षात आलेल्या तेल विक्रेत्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. व त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. (तालुका प्रतिनिधी)