शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

३१ संघटनांचे पदाधिकारी एकाच मंचावर

By admin | Updated: December 23, 2015 03:24 IST

मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील ३१ विविध जातीच्या संघटनांचे पदाधिकारी एकाच विचार मंचावर येणार आहे.

महासंवादासाठी जिल्हावासीयांना आवाहन : मराठा सेवा संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशनयवतमाळ : मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील ३१ विविध जातीच्या संघटनांचे पदाधिकारी एकाच विचार मंचावर येणार आहे. या अधिवेशनातील ‘महासंवादा’त जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२४, २५ व २६ डिसेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाचे आयोजन अकोला येथे करण्यात आले आहे. अठरापगड जातींच्या बहुजन संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन विचारमंथन व्हावे हा या महाअधिवेशनाचा उद्देश आहे. अकोला जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्यासह सर्व ३३ कक्ष अधिवेशनाची जय्यत तयारी करीत आहे. २४ डिसेंबरला दुपारी १ वाजता मिरवणुकीने अधिवेशनाचा प्रारंभ होईल. संध्याकाळी चित्रपट कलावंतांचा ‘रंगवेध’ कार्यक्रम होईल. २५ डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाअधिवेशनाचे उद्घाटन होईल. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक, कलावंत उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अकोलाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आहेत. समाजकारण, राजकारण व उद्योग क्षेत्रात मराठा महिलांचे स्थान या चर्चासत्रात माजी आमदार रेखाताई खेडेकर, खासदार भावना गवळी, वंदना चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, अ‍ॅड.समृद्धी पोरे, स्मिता देशमुख, शाहिस्ता कादरी सहभागी होणार आहे. युवकांसाठी प्रशासकीय सेवा संधी या विषयावरील चर्चासत्रात प्रभाकर देशमुख, मधुकर कोकाटे, ज्ञानेश्वर पाटील, प्रतीक ठुबे, आशिष ठाकरे, हर्षल भोयर, अनिता पाटील, मोक्षदा पाटील, स्वप्नील खेडेकर बोलणार आहे. २६ डिसेंबरला शाहिरांचे पोवाडे, सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आदी कार्यक्रम होईल. त्यानंतर विविध जाती जमातींच्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असलेला ‘महासंवाद’ होणार आहे. माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्राबाहेरील मराठा समाज व त्यांचा समन्वय’ या विषयावर मंथन होणार असून १८ राज्यातील प्रतिनिधी सहभागी होणार आहे. समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थापक उपाध्यक्ष वसंतराव बेडसे असतील. न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, शिवराज महाराज, बद्रीनाथ महाराज तनपुरे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंके, मा.म. देशमुख, प्रकाश पोहरे, भैयाजी खेडकर उपस्थित राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो समाजबांधवांनी या अधिवेशनाला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले, पप्पू पाटील भोयर, डॉ.छाया महाले, प्रा.प्रवीण भोयर, यशवंत इंगोले, डॉ.प्रभाकर काळमेघ, साहेबराव जुनघरे, दिलीप झाडे, प्रदीप साळवे, सुरज खोब्रागडे, किशोर देशमुख, राहुल गजापुरे आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)