शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वणीतील कृषी केंद्र चालकांचा बंद

By admin | Updated: February 10, 2016 03:06 IST

रासायनिक खते, कीटकनाशके परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने मंगळवारी एक दिवस दुकाने बंद ठेवली.

वणी : रासायनिक खते, कीटकनाशके परवान्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने मंगळवारी एक दिवस दुकाने बंद ठेवली.कृषी आयुक्तांच्या परिपत्रकानुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर नवीन परवाना मागणाऱ्या व्यक्तीला पदवीधर कर्मचारी नेमणूक करण्याची मूभा देण्यात आली. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी घेण्याची सक्ती करण्यात आली. देशात कुठेही चार वर्षांच्या खाली पदवी अभ्यासक्रम नाही. अकरावी व बारावी विज्ञान विषयपात्र केल्यावर चार वर्षांच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाला महाविद्यालयात दाखला मिळतो. मग दोन वर्षात स्वत:ची शैक्षणिक अर्हता जुन्या परवानाधारकांनी कशी करावी, असा प्रश्न कृषी त्यांनी उपस्थित केला आहे. कृषी केंद्रांचा व्यवसाय कणकवली पासून धानोरापर्यंत पसरला आहे. राज्याच्या ३२ जिल्ह्यांत अंदाजे ५० हजारांपेक्षा जादा कृषी केंद्र आहे. त्यापैकी केवळ दोन हजार परवानाधारक कृषी पदवीधर आहेत. उर्वरित ४८ हजार परवाराधारकांनी वेगवेगळे शिक्षण घेतले. हे परवानाधारक अनेक वर्षांपासून किटकनाशक व्यवसायात असल्यामुळे त्यांना या विषयाची जाण आहे. त्यांना विद्यार्थी म्हणून दाखला घेण्यासाठी कृषी महाविद्यालयांमध्ये जागासुद्धा उपलब्ध नाही. ३० वर्षांच्यावर वयाच्या व्यक्तीला महाविद्यालयात दाखलाही मिळत नाही. ही शैक्षणिक अट लागू झाली, तर ग्रामीण व शहरी भागातील ८० टक्के कृषी केंद्र बंद होतील. रासायनिक खतांच्या जुन्या परवानाधारकांना १० आॅक्टोबर २०१५ च्या अधिसूचनेप्रमाणे कृषी पदवी, डिप्लोमाच्या अटीतून वगळण्यात आले. कीटकनाशकांच्या ५ नोव्हेंबर २०१५ च्या पूर्वीच्या परवानाधारकांना कृषी पदवीच्या अटीतून सूट मिळावी किंवा पर्यायाने म्हणून जुन्या विक्रेत्यांकरिता किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीकरिता एक-दोन महिन्याचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे. प्रमाणपत्र पदवीऐवजी ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना प्रशांत पाचभाई, देवराव काकडे, उमेश राजुरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)