शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

अधिकारी, तलाठ्यांचा तहसीलभोवती ठिय्या

By admin | Updated: November 25, 2014 23:04 IST

तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण

वणी : तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित न राहता येथील तहसील कार्यालयाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यांना वणीत येऊन आपल्या कामांचा निपटारा करवून घ्यावा लागत आहे. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना साजे नेमून देण्यात आले आहेत. संबंधित साजात पोहोचून त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांची कामे करावीत, अशी अपेक्षा असते. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी जाऊनही तलाठी व मंडळ अधिकारी ग्रामस्थांना भेटतच नाहीत. परिणामी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ अनेक तलाठी शहरात किरायाने राहतात. अनेकदा खोली बदल होत असल्याने ग्रामस्थांना ते गवसतच नाहीत. अशावेळी तर ग्रामस्थ, शेतकऱ्यांची चांगलीच परवड होताना दिसून येते.येथील तहसील कार्यालयात गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने रूजू झालेले काही मंडळ अधिकारी, तर तहसील कार्यालयातच ठिय्या मांडून दिसतात. काही मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे मागे खांदेपालट झाले. मंडळ अधिकारी शिरस्तेदार, तर शिरस्तेदार मंडळ अधिकारी झाले. मात्र अशा मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगातून अद्याप शिरस्तेदार पदच गेलेच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठ्यांना फेरफार रजिस्टरवर मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी घेण्याकरिता रजिस्टर घेऊन तहसील कार्यालय गाठावे लागते. परिणामी मंडळ अधिकारी अन् तलाठीही साजात आढळत नाही. तहसील कार्यालयातच काही मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करतात़ काही कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी आपल्या मंडळातील अचूक माहिती ठेवतात, मुख्यालयाला भेटीही देतात. ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवितात. मात्र काही मंडळ अधिकारी तर सतत तहसील कार्यालयाच्या भोवतीच फिरून आपल्या परिसराचा कारभार हाकतात, असे स्पष्ट होत आहे. तहसीमध्ये वावरणाऱ्या अशा मंडळ अधिकाऱ्यांना आपल्या मंडळातील समस्याच दिसत नाहीत. त्यामुळे एकाही शेतकऱ्याची समस्या सुटताना दिसत नाही. काही मंडळ अधिकारी तहसील कार्यालयातच बसून राहत असल्याने काही कर्तव्यदक्ष तलाठ्यांना त्यांना शोधत तहसील कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. मंडळ अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने काही तलाठ्यांची दमछाक होत आहे़ अनेक व्यवहारांचे फेरफार लिहून तलाठ्याने ठेवले असताना आणि नियोजित २१ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही शेतकऱ्यांचे फेरफार होत नाही़ त्यामुळे शेतकरी तलाठ्यावर रोष व्यक्त करतात़ त्याला काही तलाठीही दोषी असतात. तथापि त्यांच्या वरील अधिकारी म्हणून मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते़ तेच कर्तव्यदक्ष नसतील, तर महसूल मंडळाचे काय होणार, अशी चर्चा आता होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)