शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

ज्योत्स्ना दर्डा जन्मदिनानिमित्त आज प्रेरणास्थळावर ‘स्मृतिरंग’

By admin | Updated: June 18, 2015 02:03 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या

संगीतसंध्या : यशश्री भावे-पाठक व सागर मधुमटके यांचे गायनयवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त ‘स्मृतिरंग’ या संगीतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १८ जूनला सायंकाळी ६.३० वाजता येथील प्रेरणास्थळावर करण्यात आले आहे. विदर्भाचे किशोरकुमार म्हणून नावलौकिक असलेले सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके आणि इंडियन आॅयडॉलमध्ये नागपूरचे नाव चमकविणारी गुणी गायिका यशश्री भावे-पाठक आपल्या विशिष्ट गायनाद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. जुन्या-नव्या हिंदी आणि मराठी गीतांच्या या कार्यक्रमाला वेगळाच साज आणि आठवणींचा सुगंध लाभणार आहे. संगीत संयोजन यवतमाळातील संगीतकार बाबा-किशोर यांचा नटराज आॅर्केस्ट्रा करणार आहे. निवेदन अनुजा घाडगे यांचे असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. याचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)महिलांसाठी विविध स्पर्धासखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्रा दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त १८ जून रोजी दर्डा मातोश्री सभागृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केक सजावट स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिया सजाओ स्पर्धा, दुपारी ३ ते ४ या वेळात तर ८ ते १८ वयोगटातील मुलींसाठी भूले-बिसरे गीत गायन स्पर्धा दुपारी ४ वाजता आयोजित आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना याच दिवशी प्रेरणास्थळावर आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरण केले जाणार आहे. स्पर्धा आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. पाऊस आल्यास कार्यक्रम ‘मातोश्री’ सभागृहात ‘स्मृतिरंग’ या कार्यक्रमाचे नियोजित स्थळ प्रेरणास्थळ आहे. मात्र यावेळी पाऊस आल्यास हा कार्यक्रम दर्डा मातोश्री सभागृहात घेण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे.