शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बांधकामात खांबांचा अडथळा; दुसऱ्या बाजूचेही काम सुरू होणार : वीज खांबांच्या तारा आल्या जमिनीपासून सहा फुटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:48 IST

गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या ज्या बाजूचे काम पूर्णत्वाकडे आहे, त्या बाजूला असलेल्या वीज खांबांवरील तारा जमिनीपासून केवळ पाच ते ...

गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या ज्या बाजूचे काम पूर्णत्वाकडे आहे, त्या बाजूला असलेल्या वीज खांबांवरील तारा जमिनीपासून केवळ पाच ते सहा फुटावर असून या तारांतून २४ तास वीजप्रवाह सुरू असतो. त्यामुळे एखादे वाहन या तारांना घासून गेल्यास मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. सध्या ज्या भागातून वाहतूक सुरू आहे, त्याही रस्त्याचे काम अगदी लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे त्या भागातून होणारी वाहतूक बंद करून, ज्या बाजूचे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, त्या बाजूने वाहतूक सुरू करावी लागणार आहे. मात्र काम पूर्ण झालेल्या बाजूच्या रस्त्यावर अगदी मधोमध विजेचे खांब उभे आहेत. ते हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वीज वितरण कंपनीला यापूर्वी अनेकदा पत्र दिले. मात्र त्या पत्राचा कोणताही परिणाम वीज वितरण कंपनीवर झाल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील वीज खांबांची पाहणीदेखील केली होती. मात्र त्यानंतर वीज खांब हटविण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्याचे दिसत नाही. यासंदर्भात वणी येथील बांधकाम उपविभागाचे अभियंता तुषार परळीकर यांना विचारणा केली असता, तीन दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांशी या विषयात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. वीज खांब हटविण्याबाबतचा प्रस्ताव वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे, असे परळ‌ीकर यांनी सांगितले.

बॉक्स:

वाहतुकीच्या खोळ‌ंब्याने नागरिकांना मनस्ताप

वणी-यवतमाळ मार्गावरील साईमंदिर चौक ते चिखलगाव रेल्वेगेटपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. एका बाजूने हे बांधकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहने ये-जा करीत आहेत. अनेकदा या मार्गाने जड वाहनेदेखील ये-जा करतात. त्यात त्याच बाजूने अनेक दुकाने असल्याने दुकानांपुढे दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी आहे.