शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

पोषण आहार कामगारांची दिवाळी जाणार अंधारात

By admin | Updated: October 29, 2016 00:21 IST

तोकड्या मानधनावर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांच्या पदरात ऐन दिवाळीत निराशा पडली आहे.

मानधनाची प्रतीक्षा : आॅनलाईन माहिती भरूनही देयकाला विलंबयवतमाळ : तोकड्या मानधनावर राबणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारांच्या पदरात ऐन दिवाळीत निराशा पडली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने हे कामगार अडचणीत सापडले असून दिवाळी कशी साजरी करावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांचे मानधन थकणे हा जिल्ह्यासाठी नवा मुद्दा नाही. यापूर्वीही दोन ते चार महिन्यांचे मानधन थकित राहण्याचे प्रकार घडले आहे. मात्र आता ऐन दिवाळीत पैसे मिळालेले नसल्याने मोठी कोंडी झाली आहे. पुसद पंचायत समितीमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांचे मानधन जुलै महिन्यापासून मिळालेले नाही. कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती इतरही तालुक्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारात कुठेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी शासनाने या वर्षीपासून विशेष दक्षता घेतली आहे. दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, किती धान्य शिजविले, किती शिल्लक आहे याबाबतची माहिती दररोज आॅनलाईन मागविण्यात आली आहे. त्यानुसार, संबंधित शाळेतील शिक्षक दररोज पोषण आहाराबाबतची माहिती आॅनलाईन भरत आहेत. सुरुवातीला आॅनलाईन माहिती देण्यात अडचणी जाणवल्या तरी शिक्षकांनी आता त्यावर मात केली आहे. नियमाप्रमाणे सर्वच शिक्षक वेळेत माहिती पुरविण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे. या कामात त्यांना चांगले यशही मिळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु तरीसुद्धा वरिष्ठांकडून नोंद घेतल्या जात नसल्याची खंत आहे. शासनाच्या निर्देशानुसार रोजच्या रोज आहाराची माहिती देऊनही संबंधित कामगारांचे मानधन वेळच्या वेळी मिळणे दुरापास्त झाले आहे. तब्बल तीन-तीन महिने आहार शिजविणाऱ्या कामगारांचे पैसे थकित राहात आहेत. मात्र, अशावेळी कामगारांच्या रोषाचा सामना शिक्षकांना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या संदर्भातील निधी थेट शाळांकडे वळता केला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, जुलै महिन्यापासून पुन्हा मानधनाला विलंब होत आहे. ऐन दिवाळीत मानधन न मिळाल्याने पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्रशासन म्हणते, आलबेलशालेय पोषण आहार अधीक्षक अलिकडेच रुजू झाले आहे. त्यामुळे जुने पेन्डींग मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. सध्या सप्टेंबरपर्यंतचे मानधन देण्यात आल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मात्र कामगार मानधनाच्या प्रतीक्षेत आहे.