शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:24 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पुढाकरात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण तथा शहरी भागात आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कंत्राटदारांना घरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. शासनाने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली. समान काम-समान वेतन, नियमित कर्मचाºयांना लागू असलेल्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्धार यावेळी करण्यात आला.मानव संसाधन संदर्भात असलेले योजनानिहाय मूल्यांकन ही किचकट प्रक्रिया रद्द करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीमा संरक्षण लागू करावे, सद्यस्थितीतील अभ्यास समितीने पुढाकार घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे, जिल्हा व तालुकास्तरीय बदलीबाबतचे निर्बंध हटावावे आदी मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहे. दरम्यान राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे.या आंदोलनात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश वड्डेवार, उपाध्यक्ष सचिव बोपचे, आकाश तिवारी, कोषाध्यक्ष मकरंद लोहकरे, कार्याध्यक्ष डॉ.अमोल राठोड, सचिव गोपाल इसोकर आदी सहभागी झाले आहेत.