यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाची परिपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील बीट आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटचे अनावरण पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत ठाणेदार अमोल माळवे यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी झालेल्या पोलीस मुख्यालयातील मासिक आढावा बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उपअधीक्षक पंजबाराव डोंगरदिवे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार व जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. हे संकेतस्थळ अजिंक्य नागरगोजे व संदीप वाळके यांनी तयार केले. (कार्यालय प्रतिनिधी)
आता जिल्हा पोलीस दलाचेही संकेतस्थळ
By admin | Updated: July 18, 2015 02:27 IST