शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

आता दुकानांचे शटर दुपारीच होणार डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता  जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे वेळेत कपात : जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोेरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, त्यातही अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुकानांच्या या वेळा आणखी कमी करण्यात आल्या आहेत. आता ही दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला खरेदीच्या आडून सर्वत्र अनावश्यक गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता  जिल्हाभरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या वेळाही दुपारी २ वाजतापर्यंतच मर्यादित केल्या आहेत. दुकानांच्या वेळेबाबतचा हा नियम मोडल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमभंग होईल तेथेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. हा आदेश १९ एप्रिलपासून १ मेच्या सकाळपर्यंत लागू राहणार आहे. संचारबंदी असूनही नागरिक अत्यावश्यक कामांच्या नावाखाली शहरात फिरत होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या दुकानांची वेळही कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या कमी केलेल्या कालावधीत वर्दळ व गर्दी टाळण्याची जबाबदारी नागरिकांनी पार पाडण्याची गरज आहे.  

किराणा, भाजीपाला विक्रीवर मर्यादा संचारबंदीत किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, फळविक्री या सेवांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळेच ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. मात्र, आता सोमवारपासून या अत्यावश्यक दुकानांची वेळ दुपारी २ पर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. मात्र, दूध संकलन केंद्र, दुधाचे घरपोच वितरण तसेच हॉटेलमधून पुरविली जाणारी पार्सल सेवा यांच्यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ हीच वेळ कायम ठेवण्यात आली आहे.

या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील पेट्रोलपंप, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपालसेवा केंद्र, रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक्स, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, वाहतूक व्यवस्था, पशुवैद्यकीय दवाखाने, त्यांच्या औषधांची दुकाने आदी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी २ ही वेळेची मर्यादा या सेवांना लागू नाही.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार