शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आता वीज बिल भरा मोबाईलवरून !

By admin | Updated: February 20, 2016 00:20 IST

वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने खास मोबाईल अ‍ॅप तयार केले असून....

यवतमाळ : वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने खास मोबाईल अ‍ॅप तयार केले असून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अ‍ॅप सर्व ग्राहकांसाठी खुले केल्याची माहिती महावितरणच्या अकोला परिमंडळाने दिली. या मोबाईल अ‍ॅपमुळे वीज ग्राहक आपले वीज बिल कोठेही पाहू शकतो, भरू शकतो. वीज सेवा व त्यासंबंधीच्या विविध तक्रारीही याच मोबाईल अ‍ॅपवरून नोंदविता येतात. त्यामुळे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत थांबण्याची गरज नाही. सुरुवातीच्या टप्प्यात अ‍ॅन्ड्रॉईट व ब्लॅक बेरी आॅपरेटिंग सिस्टीमच्या मोबाईलधारकांसाठी हे अ‍ॅप असणार आहे. लॅपटॉप व संगणकावरदेखील ते डाऊनलोड करता येते. महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर याबाबत अधिक सूचना देण्यात आल्या आहे. गुगल प्ले स्टोअरवर महावितरण नावाने शोधल्यास महावितरणच्या लोगोचे अ‍ॅप मोबाईलवर इन्स्टॉल करता येते. अ‍ॅप डाऊनलोड झाल्यावर जे ग्राहक वेब सेल्फ सर्व्हिसेस पोर्टलचा वापर करीत होते, त्यांना अ‍ॅपवर वेगळा आयडी तयार करण्याची गरज नसून ते थेट लॉगिंग करू शकतात. इतर ग्राहकांना नवीन खाते उघडता येते. त्यात कंझ्युमर नंबर, बिलिंग युनिट, जन्मतारीख, स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पोस्टल पिनकोड, युझर नेम, पासवर्ड आदी माहिती भरावी लागेल. अ‍ॅपमधील व्ह्यू अ‍ॅन्ड पे बिल्स् या आॅप्शनवर क्लिक केल्यास चालू महिन्याचे बिल, बिल भरण्याची तारीख इत्यादी नोंदी दिसतील. तक्रार नोंदविण्यासाठी रजिस्टर कंपलेंट हा पर्याय देण्यात आला आहे. तसेच कस्टमर केअर हे आॅप्शनही ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. या अ‍ॅपमुळे तक्रारींचा निपटारा वेळेत होण्यास मदत होईल, अशी माहिती अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)