शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शवविच्छेदन

By admin | Updated: November 26, 2014 23:13 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणीच यावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर बांधण्यात आलेले शवविच्छेदन

यवतमाळ : ग्रामीण भागातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणीच यावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर बांधण्यात आलेले शवविच्छेदन गृह पूर्ववत कार्यान्वित करण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन गृहांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींपैकी केवळ सहा ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून शवविच्छेदन करणे शक्य होते, असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून बैठकीत ठेवण्यात आला. यामध्ये उमरखेड तालुक्यातील ढाणकी, झरी तालुक्यातील मुकुटबन, पांढरकवडा तालुक्यातील रुंझा, वणी तालुक्यातील शिरपूर, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब आणि यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या शवविच्छेदन गृहांची डागडूजी केली जाणार आहे. शिवाय या आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर पारवा, वाढोणाबाजार, खंडाळा, कोरटा, फेट्रा, शेंबाळपिंपरी येथील शवविच्छेदन गृहांच्या इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने येथे पुन्हा काम सुरू करणे शक्य नाही. ज्या ठिकाणी शवविच्छेदन करणे शक्य आहे अशा सहा केंद्रांमध्ये तातडीने किरकोळ दुरुस्तीचे काम केले जावे, असे निर्देश आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांनी बैठकीत दिले. आरोग्य समितीच्या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. कार्यकारी अभियंता नितनवरे, उपविभागीय अभियंता मशरू आणि भोलशंकर यांना निर्देश देण्यात आले. बऱ्याच ठिकाणी आरोग्य केंद्राच्या इमारती हस्तांतरित झालेल्या नाही तर काही ठिकाणी उपकेंद्राच्या इमारतीचे काम रखडले आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. सध्या गावांमध्ये डेंग्यूच्या साथीचा प्रकोप आहे. गावातील डासांचे निर्मूलन करण्यासाठी सर्व तालुकास्तरावर फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने त्याची मागणी केल्यास त्वरित दिल्या जातात. ग्रामपंचायतीने फॉगिंगसाठी पेट्रोल, डिझेल आणि माणसाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्या बाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पोहोचविण्यात आली आहे. याचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुंदन राठोड, हिवताप अधिकारी डॉ.सुरेश तरोडेकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)