शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२४ नोव्हेंबर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

By admin | Updated: November 18, 2015 02:30 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त ....

कौशिकी चक्रवर्ती यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे संगीत, कला, निसर्ग आदींवर निस्सीम प्रेम होते. आयुष्यभर त्यांनी आपले संगीत प्रेम जोपासले. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनाला संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक अजय चक्रवर्ती आणि अंजना चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी आपल्या असामान्य गायन शैलीने यवतमाळकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. कौशिकी यांनी वयाच्या ७ व्या वर्षीपासून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. कोलकाता येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जोगमायादेवी कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. तत्त्वज्ञान या विषयात प्रथम श्रेणी डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनात आपल्या गायकीचा स्वतंत्र ठसा उमटविला. अनेक मोठ्या संगीत समारोहातून कौशिकी यांनी आपल्या गायकीने रसिकांंना मंत्रमुग्ध केले. मुख्यत्वे करून भारतातील आयटीसी संगीत संमेलन, कॅलिफोर्नियाचा स्प्रिंग फेस्टिव्हल आॅफ म्युझिक, लॉसएंजिल्सचा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव या सारखे भव्यदिव्य कार्यक्रमांचा समावेश आहे. कौशिकी चक्रवर्ती यांंना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. त्यात १९९५ सालचा जाडू भट्ट, २००० साली आऊट स्टॅन्डींग यंगपर्सन, २००५ साली बीबीसी अवार्ड संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी अनेक बांगला व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायनही केले आहे. अशा या शास्त्रीय गायिका आपल्या असामान्य गायन शैलीची जादू यवतमाळकरांवर टाकणार आहे. या शास्त्रीय मैफलीत त्यांना तबल्यावर संदीप घोष साथ देणार असून हार्मोनियमवर अजय जोगळेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाला यवतमाळकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.