शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात ‘गब्ब्या’ वणी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: March 22, 2017 00:13 IST

घरफोडीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या अखेर वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

वणी : घरफोडीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या अखेर वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने सात गुन्ह्यांची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घरफोडीचे गुन्हे घडत होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी पोलीस दप्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी खबरे नेमले. तसेच घरफोडीच्या चौकशीसाठी एका पथकाचे गठण केले. दरम्यान, घरफोडी करण्यात सराईत असलेला कुख्यात मोहम्मद नावेद उर्फ गब्ब्या हा ब्राह्मणी फाटा परिसरात फिरत असल्याची टिप ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानुसार कुळकर्णी यांच्या नेतृत्वात डी.बी.पथकाने ब्राह्मणी फाटा परिसराकडे धाव घेतली. पोलिसांचा ताफा दिसताच, गब्ब्याने पळ काढला. मात्र डी.बी.पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता त्याने वणी शहरात केलेल्या सात घरफोड्यांची कबुली दिली. पोलिसांनी दोन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे, पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक दुर्गालाल टेंभरे, जमादार वानोळे, अरुण नाकतोडे, डी.बी.पथकाचे कर्मचारी नायक पोलीस नफीस शेख, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, रुपेश पाली, दिलीप जाधव, नितीन सलाम, महेश नाईक, अमित पोयाम, चालक प्रशांत आडे यांनी केली. गब्ब्याने घरफोडी करण्यात वाक्बगार असून त्याने यापूर्वी अनेक घरफोडीचे गुन्हे केले आहे. पोलिसांवर हल्ला करणे, न्यायाधिशांवर चप्पल भिरकावणे अशा पद्धतीच्या गंभीर गुन्ह्यात त्याला अटकही झाली आहे. त्याच्या अटकेने गुन्ह्यांना आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)