शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निलंबिताची सीईओंसह १० अधिकाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: March 11, 2016 02:51 IST

यवतमाळ पंचायत समितीमधील ५१ लाखांच्या मुद्रांक शुल्क अपहार प्रकरणातील निलंबित विस्तार

यवतमाळ : यवतमाळ पंचायत समितीमधील ५१ लाखांच्या मुद्रांक शुल्क अपहार प्रकरणातील निलंबित विस्तार अधिकाऱ्याने आपल्यावरील आरोप फेटाळत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह १० जणांना वकिलाद्वारे नोटीस बजावली आहे. सेवानिवृत्त झालेले प्रल्हाद गणपत पारवे (भारतनगरी भोसा, यवतमाळ) असे या निलंबित विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. यवतमाळ पंचायत समितीमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात मुद्रांक शुल्क अनुदानाच्या रकमेत ५१ लाख ७ हजार ८०४ रुपयांचा अपहार झाल्याचे तीन सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. या समितीने आपला अहवाल ६ सप्टेंबर २०१४ ला सीईओंना सादर केला. त्या आधारे २४ डिसेंबर २०१४ रोजी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रभारी बीडीओ संजय ईश्वरकर यांनी तक्रार नोंदविली. त्यावरून पारवे यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ४०९, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. या प्रकरणी पारवे यांचे २३ आॅगस्टला निलंबित केले गेले. निलंबन काळातच ते सेवानिवृत्त झाले. आता प्रल्हाद पारवे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत अ‍ॅड. मनीष सिरसाठ (अमरावती) यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या दहा अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये सीईओ, अ‍ॅडिशनल सीईओ, डेप्युटी सीईओ, तत्कालीन प्रभारी बीडीओ, सहायक लेखाधिकारी, विस्तार अधिकारी, अधीक्षक व सहायकाचा समावेश आहे. निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेऊन नंतर सेवानिवृत्ती द्यायला हवी होती, खात्यांतर्गत चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. मुद्रांक शुल्क ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत असताना व सरपंच-सचिवाच्या स्वाक्षरीशिवाय तो निघत नसताना आपल्यावर अफरातफरीचा आरोप कसा ?, सन २००९-१०, २०१०-११ व २०१२ या वर्षात मुद्रांक शुल्क निधीचा प्रभार दुसऱ्या व्यक्तीकडे होता, असा बचाव घेत पारवे यांनी आरोप फेटाळले आहे. या प्रकरणी झालेली चौकशी सदोष आहे, फेरचौकशी करण्यात यावी, खातेनिहाय चौकशी, एफआयआर मागे घ्यावा व निवृत्तीचे लाभ देण्यात यावे, अशी मागणीही पारवे यांनी या नोटीसद्वारे केली आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे जाणार असल्याचेही पारवे यांचे वकील अ‍ॅड. मनीष सिरसाठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)