शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुलरमध्ये गुंगीचे औषध

By admin | Updated: June 7, 2014 01:54 IST

कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून संपूर्ण घर लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

श्रीकृष्णनगरात तीन घरफोड्या :  घराबाहेरील कुलर धोकादायक

यवतमाळ : कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून संपूर्ण घर लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी रात्री दर्डानगर परिसरातील श्रीकृष्ण नगरात अशा  पद्धतीने तीन घरे फोडण्यात आली. चोरट्यांनी हा नवा फंडा शोधून काढला असून अशी टोळीच शहरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.श्रीकृष्णनगर येथील डॉ. प्रतीक सुनील खोडवे यांनी आपल्याकडील चोरीची वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अन्य दोन घरी  झालेल्या चोर्‍यांची मात्र अद्याप तक्रार नोंदविली गेलेली नाही. घटनेच्या वेळी खोडवे यांच्याकडे आई आणि भाऊ हे दोनच सदस्य घरात होते. एरवी  रोज रात्री ३ वाजता पाणी पिण्यासाठी उठणार्‍या डॉ. सुषमा खोडवे आणि त्यांचा मुलगा त्या रात्री गाढ झोपी गेले होते. घरात चोरट्यांनी मागील दाराने  प्रवेश केला. सुषमा खोडवे यांच्या उषाखाली ठेवलेली चाबी काढून चोरट्यांनी कपाट उघडले. त्यातील रोकड, सुमारे ३0 ग्रॅम सोन्याचे दागिने  लंपास  केले. घरातील महागड्या साड्या व अन्य साहित्याची फेकाफेक केली. खोडवे यांच्या मुलाची पल्सर गाडीही चोरट्यांनी नेली. परंतु चिंतामणी ट्रॅव्हल्स  नजीक ती सोडून देण्यात आली. घराच्या आवारात उभी असलेली कारही नेण्याचा त्यांचा मनसुभा असावा. कारण कारची चावी कंपाऊंडच्या भिंतीवर  आठळून आली. पहाटे ५ वाजता झोप उघडल्यानंतरच चोरीचा हा प्रकार पुढे आला. कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकून ही चोरी केली असावी, असा संशय सुषमा खोडवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी  घरातील साफसफाईसाठी दोन मुलांना बोलविले होते. ही मुले पूर्ण वेळ घरात वावरली. त्यातील एकाने मागील दार तुटलेले असल्याची जाणीवही  खोडवे यांना करून दिली आणि नंतर याच तुटलेल्या दारातून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. श्रीकृष्णनगरातीलच अन्य दोन घरांनाही चोरट्यांनी  याच पद्धतीने निशाणा बनविले. तेथेही घटनेच्यावेळी  घरात अनेक सदस्य झोपलेले होते. त्यांच्याकडील दोनही कुलरमध्ये गुंगीचे औषध टाकल्याचा  संशय आहे. यापूर्वी हाच फंडा वापरुन बोरीअरबमध्ये एकाच रात्री पाच ते सहा घरे फोडण्यात आली होती. चोरट्यांचा हा फंडा घराबाहेरील  कुलरसाठी धोकादायक ठरू लागले आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)यवतमाळ शहरात गेल्या दोन महिन्यांत चोरी व घरफोडीच्या सव्वाशेवर घटनांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी दागिने व रोकड असा लाखोंचा ऐवज  लुटून नेला. अनेक चोर्‍यांची तर तक्रारही नोंदविण्यास पोलीस टाळाटाळ करतात. सीतारामनगरी भागातील नागरिकांना याचा अनुभव गेल्या  आठवड्यात आला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चोर्‍या होत असूनही पोलिसांचे डिटेक्शन मात्र शून्य आहे. डीबी स्कॉड, क्राईम ब्रँच आणि एसपींची  विशेष पथके चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.