शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

कोहळा येथे भरते विनाविद्यार्थ्यांची शाळा

By admin | Updated: November 30, 2014 23:13 IST

एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे,

मुख्याध्यापकाची हजेरी : शिक्षण विभागाच्या बेफिकिरीचा नमुना किशोर वंजारी - नेरएक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे, नेर तालुक्यातील पुनर्वसित कोहळा गावचे. शिक्षण विभागाच्या बेफिकिरीचा हा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. नेर तालुक्यातील कोहळा हे गाव प्रकल्पग्रस्त. कोहळा गावाचे दोन भागात पुनर्वसन झाले. एक भाग नेर शहरानजीक तर दुसरा दगडधानोरा गावालगत आहे. मात्र कोहळा गावात आजही दहा ते बारा घरे कायम आहे. येथे पहिलीपासून चवथीपर्यंत शाळा आहे. परंतु ही शाळा पुनर्वसनात गेली. त्यामुळे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर शाळेची इमारत बांधण्यात आली. यंदा या शाळेत १२ विद्यार्थी पटावर आहेत. दोन शिक्षकांची येथे नियुक्ती आहे. मुख्याध्यापक म्हणून पदभार असलेले शिक्षक नियमित येत होते. विद्यार्थीही येथे ज्ञानार्जनासाठी जात होते. परंतु एक शिक्षक या शाळेकडे फिरकतही नव्हता. विद्यार्थ्यांची होणारी ही दुरवस्था पाहून पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला. तेव्हापासून एकही विद्यार्थी या शाळेत जात नाही. शिक्षकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायला पालक तयार नाही. वाहनाची व शिक्षकाची व्यवस्था झाली तर आम्ही मुलांना पाठवू असे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गत चार महिन्यांपासून एकही विद्यार्थी या शाळेत आला नाही. येथील कार्यरत मुख्याध्यापक दररोज वेळेवर शाळेत जातात आणि ५ वाजता घराकडे निघून जातात. विद्यार्थीच नाही तर शिकवायचे कुणाला असा प्रश्न त्यांना सतावत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी पंचायत समितीकडे माझी येथून बदली करा, अशी लेखी मागणी केली. मात्र या मागणीकडे शिक्षण विभाग डोळेझाक करीत आहे. विद्यार्थी येत नाही, हे माहीत असूनही शिक्षण विभागाने उपाययोजना केल्या नाही. मुख्याध्यापक मात्र शाळेत जाऊन हजेरी लावतात. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी पालक जगदीश खासदार यांनी केली.