शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांना पाल्यांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:37 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देमंजुरीचे अधिकार ‘डीसीं’ना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.महामंडळातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अग्रीम रक्कम दिली जाणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर केवळ दोन दिवसात ही रक्कम उपलब्ध होईल अशी सोय करण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ५० हजार, तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता दोन लाख रुपयांपर्यंत अग्रीम दिले जाणार आहे. रक्कम मंजूर करण्याचे अधिकार विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.महाविद्यालयात प्रवेश घेतानाच ही रक्कम कामगारांना मिळणार आहे. मात्र शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या रकमेची वसुली पुढील महिन्यापासून केली जाणार आहे. कामगार कुठल्याही कारणावरून सेवेतून कमी झाल्यास शिल्लक रजेचा पगार किंवा इतर देयकातून वसुली करण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र कर्मचाऱ्यांकडून घेतले जाणार आहे. एसटीच्या सेवेत पती-पत्नी असल्यास एकाच जणाला अग्रीम देण्यात येणार आहे. यातील एकाची सेवा समाप्त झाल्यास सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याकडून अग्रीम रक्कम वसूल करण्यात येणार आहे.दरवर्षी मिळणार अग्रीमकामगाराच्या मुलाने तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास दरवर्षी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अग्रीम दिला जाणार आहे. पहिल्या वर्षीच्या अग्रीमाची शिल्लक अधिक दुसऱ्या वर्षाच्या अग्रीमाची रक्कम आणि तिसºया वर्षासाठी अग्रीम मंजूर करताना पूर्वीची वसुली विचारात घेतली जाणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा शिल्लक राहिलेला कालावधी तपासला जाणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनापैकी किमान १/४ वेतन मिळेल याची दक्षता घेण्यात येणार आहे. वसुलीसाठी रकमेचे हप्ते पाडून दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी ही रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक