शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: February 12, 2017 00:22 IST

भाजपा सरकार एक एक लोकविरोधी निर्णय घेत आहेत. या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.

धनंजय मुंडे : जवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सभा आर्णी : भाजपा सरकार एक एक लोकविरोधी निर्णय घेत आहेत. या सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने त्यांना चुकीच्या कारभाराची जाणीव करून द्यायची असेल किंवा रोखायचे असेल तर आमचे हात मजबूत करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले. जवळा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, भाजपा सरकारच्या ‘अच्छे दिन’ची चेष्ठा आता गावागावात होत आहे. कालाधन वापसची घोषणा घोषणाच राहिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही. उलट कमी भावात शेतमाल विकावा लागला. यात त्यांचे मोठे हात आणि नुकसान झाले. या सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू असे सांगितले होते. परंतु अजूनही अंमलबजावणी केली नाही. आपण यावेळी सरकारविरोधी कौल द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रसंगी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया यांनीही विचार मांडले. जवळा गटाच्या उमेदवार डॉ. आरती फुपाटे आदींची यावेळी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गाय नेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण शेतकरी असल्याचे सांगतात. मात्र ते कोणत्याही अँगलने शेतकरी वाटत नाही. मी आजही गायीचे दूध काढू शकतो असे ते सांगतात. आता हे सिद्ध करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एक गाय घेऊन जातो अन् त्यांना दूध काढायला सांगतो. यासाठी त्यांना खाली बसता आले नाही तर मी गायीला टेबलवर चढवितो अन मुख्यमंत्र्यांना उभ्याने दूध काढायला लावतो. यानंतर यातील सत्य जनतेपुढे आणतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.