शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत.

ठळक मुद्देयवतमाळातील स्थिती; शहराची सुरुवातच कोलाम पोडापासून, दुर्गम भागात पालिका पोहोचलीच नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, भोसा, उमरसरा या ग्रामीण भागातील नव्या वसाहतींमध्ये ना धड रस्ते व वीज पुरवठा आहे. आता कुठे नव्या वसाहतीत नळाची पाईपलाईन टाकली जात आहे. नळ कधी येतील याचा पत्ता नाही. या नव्या वसाहतींमध्ये विकास कामांसाठी निधीची चणचण असल्याने नागरिकांना अगदीच प्राथमिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने रस्त्यावरच गटार तयार झाले आहेत. माेठमोठ्या निवासी संकुलाचे सांडपाणी रस्त्यावरून जात आहे. अशा एक ना अनेक समस्या नगरपरिषदेत आहे. यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत. त्यावरच ती मंडळी समाधान मानत आहे. अशीच स्थिती लोहारा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, भोसा, उमरसरा येथे नव्याने उदयास आलेल्या ले-आऊटमध्ये आहे. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ताच नसतो, तर पिण्याकरिता पाणी नसल्याने पायपीट करावी लागते. वीज पुरवठाही वारंवार खंडित होतो. बऱ्याच भागात पथदिवेही नाहीत.

रस्ता, वीज, पाण्याच्या समस्या कायमचशहरात समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायतींमध्ये नवीन ले-आऊट तयार झाले. आता तेथे नागरीकरण होत आहे. याठिकाणी रस्ते, नाल्या, वीज पुरवठ्याचे खांब उपलब्ध नाहीत. नगरपरिषदेचा विस्तार करताना आजूबाजूच्या सर्व घाटापर्यंतच्या सीमा पालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. २०१६ मध्ये विस्तारलेल्या नगरपालिकेला या भागांमध्ये कुठलीच विकास कामे पोहोचविता आली नाही. आजही एखाद्या डोंगरदऱ्यात वसलेल्या आडवळणावरील वस्तीसारखी स्थिती येथील नागरिकांची आहे. नावालाच नगरपरिषद क्षेत्र असून ग्रामीण भागापेक्षाही समस्या गंभीर आहे. विकास शुल्क न भरताच ले-आऊट तयार झाल्याने आता त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे.

उकंडा पोडावर आतापर्यंत रस्ते, पाणी, वीज नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांत स्थानिक नगरसेवक विजय खडसे यांच्या पाठपुराव्याने ही कामे सुरू झाली आहेत. आमच्या येथे सर्व शेतकरी, शेतमजूर राहतात. शहरात आहोत हे आम्हाला अजूनही वाटत नाही. मेहनतीची कामे करून पोट भरणे हिच दिनचर्या आहे. घरकूल व इतर याेजना आलेल्या नाहीत. - दशरथ देवकर, उकंडा पोड

वडगावमध्ये येत असलेल्या इंद्रायणीनगर येथे अजूनही रस्ते, नाल्या, विजेचे खांब, नळ योजना पोहोचलेली नाही. एखाद्या दुर्गम भागात राहावे, अशी स्थिती आहे. पालिकेकडून कोणतीच सुविधा येथे दिली जात नाही. याठिकाणी घंटागाडी तर सोडाच सांडपाण्याच्या नाल्याही नाहीत. पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.  - अरुणा राऊत, इंद्रायणीनगर, वडगाव

शहराच्या विस्तारानंतर बराच मोठा भाग नगरपालिकेत जोडला गेला आहे. नव्या ले-आऊटमध्ये मुलभूत सोयीसुविधांची कामे होणे बाकी आहे. त्यासाठी नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे. निधीची उपलब्धता होताच या भागातही सुविधा देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावरही पाठपुरावा सुरू आहे.-ममता राठोड, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ

या वसाहती बनल्या समस्यांचे माहेरघर

२०१६ मध्ये सात ग्रामपंचायती शहरात विलीन झाल्या. या भागातील विकास कामे तेव्हापासून ठप्प आहे. लोहारा, वाघापूर, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, भोसा येथील अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सोयीसुविधाही पोहोचलेल्या नाहीत.

समस्या काय आहेत?

दुर्गम भागात असलेल्या वस्त्यांमध्ये नगरपरिषदेची कोणतीच यंत्रणा पोहोचत नाही. प्रभाग क्र.१ मध्ये येत असलेल्या उकंडा पोड, लोखंडबर्डी, जामडोह पोड, करकडोह पोड, मासोळी पोड येथे स्थानिक नगरसेवकाशिवाय कोणीच प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. आदिवासी बहुल असलेला हा दुर्गम भाग कायम उपेक्षित राहिला आहे. काही ठिकाणी आता कुठे रस्ते होत आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा