शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जापंप योजनेला शेतकऱ्यांचा ‘नो-रिस्पॉन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:47 IST

दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता.

ठळक मुद्देयोजनाच गुंडाळण्याची महावितरणची तयारी : अर्ज आले एक हजार, पैसे भरले केवळ ५९० शेतकºयांनी

रूपेश उत्तरवार ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : दुर्गम क्षेत्रातील कृषि पंपाना वीज पुरवठा करणे अशक्य झाले. अशा ठिकाणी सौर पंप जोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र ही योजना गुंडाळली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याने सौर कृषी पंपांसाठी निम्म्याच शेतकऱ्यांनी स्वत:चा वाटा वीज कंपनीकडे जमा केला आहे.जिल्हा आदिवासीबहुल आणि डोगरदºयात वसलेला आहे. अनेक तालुक््यात डोंगरी भाग आहे. अद्याप अशा भागापर्यंत वीज जोडणी पोहोचली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना इच्छा असूनही कृषी पंप जोडणीसाठी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दुर्गम क्षेत्र आणि ज्या भागामध्ये अद्याप वीज वाहिनी पोहोचली नाही, अशा भागातील शेतकऱ्यांना कृषी पंपाना वीज पुरवठा देण्याकरिता सौर योजना हाती घेण्यात आली. महावितरणने शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रथम चांगला प्रतिसाद लाभला. मात्र वीज कंपनीकडून ही योजनाच गुंडाळण्याची हालचाल सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले. यामुळे स्वत:चा वाटा भरायचा किंवा नाही, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडले आहे.अशी आहे अर्ज संख्यासौर पंपाकरिता जिल्ह्यातील एक हजार ८८ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ५९० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले. त्यातील ४५५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंपाची जोडणी मिळाली आहे. मात्र इतर शेतकऱ्यांनी अद्याप पैसे भरले नाही.डिमांड देऊच नकावीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी सौर पंपाकरिता नव्याने डीमांड ड्रॉफ देऊ नका, अशा सूचना दिल्या. दरम्यान, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यांना वीज जोडण्या मिळतील, असे वीज कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.