शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर समस्यांचा डोंगर, लोकप्रतिनिधींना नाही सवड

By admin | Updated: April 5, 2017 00:18 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले.

कर्ज परतफेडीचा पेच : शेतमालाला हमी दर मिळणेही दुरापास्त यवतमाळ : शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा कळवळा दाखविणारे लोकप्रतिनिधी सत्तेवर येताच आश्वासन विसरले. यामुळे साध्या तूर खरेदी असो अथवा पीक विम्याची मदत आणि सोयाबिनच्या अनुदानाचा प्रश्न, लोकप्रतिनिधींना सोडविता आला नाही. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या महिन्यापासून शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर पडून आहे. या गंभीर स्थितीवर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींना सवड मिळाली नाही. उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती काबिज करण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे व्यक्त केला होता. त्यानुसार शासकीय तूर खरेदी केंद्रावर किमान पाच लाख क्विंटल तूर येण्याची शक्यता होती. या दृष्टीने जिल्ह्यातील १५ केंद्रावर उपाययोजना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तशा उपाययोजनाच झाल्या नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. यावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या नाही. या केंद्रावरील समस्या अद्याप सुटल्या नाही. अद्याप बारदाना पोहोचला नाही. तत्काळ बारदाना पोहोचवावा, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनने केली. स्मरणपत्र दिले, तरीही बारदाना आला नाही. उशिरा चुकारे मिळणाच्या समस्येचे कुणाला घेणे-देणे नाही. यामुळे विविध अडचणींचा सामना शेतकरी करीत असले तरी लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. (शहर वार्ताहर) केवळ २00 रूपयांचे अनुदानही दूरच सोयाबीनला २०० रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला. सातबाऱ्यावर नाव नसले तरी संयुक्त कुटुंबातील सदस्य असल्याने जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे २७ लाखांचे प्रस्ताव फेटाळले. यावर लोकप्रतिनिधी अवाक्षर बोलायला तयार नाही. पीक विम्याचा आधारही आता झाला धूसर गतवर्षी रबीची अवस्था बिकट होती. यामुळे विमा उतरविणारे सर्वच शेतकरी पात्र होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पाच हजार शेतकरी पात्र झाले. ३२ हजार शेतकरी अपात्र झाले. ही मदतही मिळत नसल्याने कर्ज परतेडीची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.