लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : ग्रामीण भागातील लोकांची सेवा करीत आहे आणि पुढेही करत राहणार आहे. सर्वांसाठी माझ्या घराचे दार २४ तास उघडे आहे. सामान्यातला सामान्य माणूस आपल्याला थेट भेटू शकेल. कुठल्याही मध्यस्थाची गरज भेटीसाठी पडणार नाही, असा विश्वास यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी जनतेला दिला.यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार, रुई येथे बाळासाहेब मांगुळकर यांनी जनतेची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. अकोलाबाजार येथे झालेल्या सभेत त्यांनी विविध प्रश्नांना हात घालत सरकारच्या धोरणावर टीका केली. यवतमाळ शहरातील दादागिरी, गुंडगिरीचा बंदोबस्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी आदी समस्या निकाली काढल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व भागांना भेट दिली. नागरिकांचे प्रश्न, समस्या आस्थेने जाणून घेतल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले. अकोलाबाजार, रुई परिसरातही त्यांच्या स्वागतासाठी लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले.अकोलाबाजार येथे सभेला मंचावर पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण राठोड, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, रवी ढोक, रमेश भिसनकर, वामनराव गाडगे, प्रवीण मोगरे, दिलीप सोनोने आदी उपस्थित होते. नागरिकांच्या भेटीप्रसंगी बाळासाहेब मांगुळकर यांच्यासोबतच डॉ. कृष्णराव कावळे, पांडुरंग कराळे, नामदेव जाधव, पुरुषोत्तम राऊत, सुरेश मनवर, काशीराम राठोड, शे. मन्नान शे. अली, भालचंद्र कलाणे, दिनेश बाकरेवाल, विनोद खंडाळकर, सीताराम आडे, संजय डाखोरे, रमेश जिभकाटे, संतोष वानखडे, दिलीप जयस्वाल, रमेश पवार, धनसिंग पवार, गजानन शिवरकर, राजू डफळे, चिंतामण पायघण, बंडू राठोड, सीमाराम राठोड, गजानन कडुकार आदी होते.
मध्यस्थाची गरज नाही, थेट भेटू शकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST
यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार, रुई येथे बाळासाहेब मांगुळकर यांनी जनतेची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. अकोलाबाजार येथे झालेल्या सभेत त्यांनी विविध प्रश्नांना हात घालत सरकारच्या धोरणावर टीका केली. यवतमाळ शहरातील दादागिरी, गुंडगिरीचा बंदोबस्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणी आदी समस्या निकाली काढल्या जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मध्यस्थाची गरज नाही, थेट भेटू शकता
ठळक मुद्देबाळासाहेब मांगुळकर : अकोलाबाजार, रुई येथे स्वागत